मानवता आणि हिंदुत्व
● मी पूर्णपणे मानवतावादी आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दलितांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूने बोलत आलो आहे; तसेच हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने देखील बोलतो व संघाच्या कामात आहे.
● हिंदू धर्माच्या रक्षणाची आजही गरज आहे. हिंदू धर्माच्या पतनाची जी कारणे आहेत त्यात
१. धर्मात एकी नसणे हे एक महत्वाचे कारण.
# पण केवळ त्यामुळेच पराभव झाला असे म्हणता येत नाही.
२. क्रूर आक्रमकानी समृद्धी मध्ये उच्च स्तरावर असलेल्या आणि त्यामुळे शांत निवांत असलेल्या हिंदूंची लांडगे तोड केली. येथे सत्ता स्थापन केली. त्या भयातून अनेक जण मुसलमान झाले. आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यात मुस्लिमांची जी प्रचंड संख्या दिसते; त्यामागे मुळात ते जबरदस्तीने धर्मांतरण केले हे आहे.
३. फंदफितुरी त्यांच्या मदतीला आली. फंद फितुरी करणाऱ्यांच्या मध्ये अनेक मराठा सरदार हि होते. खुद्द छ. शिवाजी महाराजांना देखील त्यांचा नि:पात करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला.
■ त्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी बड फुकन, महाराणा प्रताप व शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य प्रभावी व यशस्वी ठरले.
● पुढे संपूर्ण देशावर राज्य स्थापन करणारे बाजीराव पेशवे यांचे मोठे योगदान राहिले. महाराजांनी केलेले कार्य थोरच होते. परंतु तिथे थांबता येत नव्हते. आणि म्हणूनच संभाजीराजे, शाहूमहाराज, बाजीराव पासून ते माधवरावांपर्यंत ( राघोबा दादांनी सुद्धा ) जे काम केले ते महत्त्वाचे होते.
● पुढे ब्रिटिश आले आणि त्यांनी उखळी तोफा आणि भेदनीती च्या साह्याने देशावर राज्य स्थापन केले.
● त्या काळात जिहाद, गजवा ए हिंद, इस्लामायझेशन ऑफ द वर्ल्ड या संकल्पनांनी भारीत असलेल्या काही मुस्लिमांनी आपला अजेंडा आतमध्ये थोडासा दडवून ठेवला. त्यातच त्यांना महात्मा गांधींनी केलेले लांगुलचालनाचे राजकारण उपयोगास आले. पुढे ब्रिटिश थोडे वीक झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर - डायरेक्ट ॲक्शन या नावाने हिंदूंची कत्तल सुरू केली आणि त्यातून पाकिस्तान हा भारताचा मोठा लचका तोडला. इथेच ते थांबले नाहीत तर काश्मीर बळकवण्याचाही प्रयत्न केला. आजही काश्मीर मध्ये सर्वात जास्त आतंकवाद आहे. जेव्हा बहुसंख्या येते; तेव्हा हे सर्व उफाळून येते.
● संपूर्ण सत्ता हाती आल्यानंतर तर काय विचारूच नका.आज पाकिस्तानात 1947 ला आठ टक्क्यांवर असलेली हिंदूंची संख्या एक टक्क्यावर आली आहे. तर बांगलादेशात अर्ध्या टक्क्यावर आली आहे. म्हणूनच हे खरे आहे की विषय संपलेला नाहीये. लांगुलचालन किंवा स्युडो सेक्युलर पद्धतीने चालणारे गव्हर्मेंट उपयोगाचे नाही. जे पाकिस्तानात किंवा बांगलादेशात घडले ते कुठल्याही बहुसंख्या असलेल्या प्रांतात वा संपूर्ण देशात घडू शकते. हिंदूंचा मान सांभाळणारे सरकारच हवे. धर्मरक्षण ही आजही एक गरज आहे. आधी १९०० ला सावरकर आणि नंतर १९२५ ला च डॉक्टर हेडगेवार बाबांनी परिस्थिती ओळखली. धर्मरक्षणासाठी आवश्यक ते कार्य सुरू केले आणि आजही संघ ते कार्य करीत आहे. आता संघ विचारांचे सरकार त्यासाठी आवश्यक व उपयुक्त काम करीत आहे.
● त्यात काही त्रुटी जरूर राहिल्या आहेत. भविष्यकाळात त्या भरून काढण्याची गरज आहे.
त्यासाठी जातिवाद टाकून देऊन सर्व जातीच्या हिंदू बांधवांनी एकत्र राहणे देखील आवश्यक आहे.
● मुस्लिम बांधवांनी आपला आपला धर्म पाळावा. अल्लाह वर इमान ठेवावे. परंतु इतरांना अल्लाह वर इमान ठेवण्याची जबरदस्ती करू नये. त्यासाठी काफीर विरुद्ध जिहाद, गजवा ए हिंद अशा गोष्टींचा विषय मनात न ठेवता सौहार्द टिकवून ठेवावे; एवढी अपेक्षा आहे. ते केले तर मग कुठल्याच प्रकारचा संघर्ष इथे राहणार नाही.
~ प्रसाद फाटक.
Comments