भारताबाहेरील जगासंबंधी पुस्तकांचे वाचन आवश्यक ?

आपण प्रत्येकानेच - वेगवेगळ्या प्रकारचे सगळीकडील साहित्य वाचावे - ही विनंती. 
 मगच आपले मत बनवावे.
 माझे वाचन अतिशय मर्यादित आहे;
पण तरीही बाहेरचे जे थोडाफार वाचले ते असे _
●१ ब्रिटिश : 1812 व 1885 सालातील ब्रिटिश संस्कृती संबंधित माहिती देणारी 3 पुस्तके - सेन्स अँड सन्सिबिलिटी, प्राइड अँड प्रिजुडीस, पोर्टेट ऑफ अ लेडी ही पुस्तकं वाचली आहेत.
●२ अमेरिकन : चार्ली चैप्लिन, अब्राहम लिंकन व एक होता कार्व्हर चे चरित्र वाचले आहे. 
शांता शेळके अनुवादित चारचौघी हे अमेरिकन जीवन व संस्कारक्षम माते संबंधीचे पुस्तक वाचले आहे.
●३ अफगाणिस्तान : तेथे जन्मलेल्या व अनुभूती घेतलेल्या मुलाचे चरित्रात्मक वाटणारे किंवा वास्तवास धरून असलेले द काईट रनर वाचले आहे.
 नॉट विदाऊट माय डॉटर वाचले आहे.
●४ पोलंड : डायरी ऑफ अ यंग लेडी हे जर्मन / पोलंड येथील कु. आना फ्रेंक हीचे पुस्तक वाचले आहे.
●५ रशिया : येथील क्रांतीसंबंधी कार्यकर्ता परिचय असणारे मॅक्झिम गॉर्की हे वाचले आहे व त्याचे आई हे कादंबरी वाचली आहे.
●६ 
 कुराण व बायबल थोड्या प्रमाणात वाचले आहे.
 😇 आणि इतर काय काय ते आठवत नाही.
●● अनेक भाषातील चित्रपट देखील पाहिले आहेत. 
( जरी ते अतिरंजीत असले तरीदेखील त्याचा लसावी आपल्याला नक्कीच काढता येतो. )
 एकूण हे सगळं वाचल्या / पाहील्या नंतर - असं लक्षात येतं की -
सदाचार, सुसंस्कृतपणा व चांगुलपणा हे सर्वत्र आहे. तशी शिकवणूक देखील सर्वत्र दिली जाते.
चांगली व वाईट प्रकारची तसेच ग्रे शेडची माणसे सगळ्या दुनियेत आहेत. 
 त्यावर कोणाचीच मक्तेदारी नाही.  तसेच त्यांचा तसे असण्याशी तेथे प्रभावी असणाऱ्या धर्माचा काही एक संबंध नाही.
 [ आणि व्हाईस अ व्हर्सा.  ] ☺️🙏 

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.