धर्मसत्ता इतिहास व आजच्या जगाची खरी गरज.
■ Vikings of European countries च्या इतिहासा संबंधीत सिरीयल्स पाहताना असे वाटले की खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून ए आय ला विचारले त्यातून अशी माहिती मिळाली -
● AI on christianization of Europe -
" युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची पहिली पावले पहिल्या शतकाच्या मध्यात पडली. प्रामुख्याने प्रेषित पॉलच्या मिशनरी प्रवासातून, ज्याने येशूच्या शिकवणी रोमन साम्राज्याच्या भूप्रदेशात आणल्या.
युरोप १४०० वर्षांच्या धर्मांतर प्रक्रियेतून गेला. जुने धर्म संपून फक्त ख्रिश्चनीटी तेथे राहिली. ती प्रक्रिया सुरुवातीला मिशनरी पद्धतीची, शांततेची तर नंतर मात्र संघर्ष, भूलथापा व सत्तेचा बळाचा अनिर्बंध वापर करून देखील धर्मांतरे झाली. अखेर १५ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यूरोप पूर्ण क्रिश्चियन झाला. त्यानंतर आज पृथ्वीवर कोणताही पेगन धर्म अस्तित्वात नाही. "
● असेच काहीसे आपल्या इथे घडत आहे म्हणून भारतातील इस्लामीकरणाचा इतिहास विचारला.
AI -
" इस्लामी धर्माची भारतातील सुरुवात ७१२ मध्ये व्यापारी समुदायांनी शांततेत केली होती. तर नंतरच्या शतकांमध्ये १० व्या-११ व्या शतकात गझनवी छाप्यांपासून सुरू होऊन लष्करी विस्ताराशी संबंधित पद्धतशीर, अनेकदा जबरदस्तीने धर्मांतर झाले. "
● आता यावर माझे म्हणणे मांडतो आहे :
भारतावरील इस्लामी आक्रमण अद्याप संपलेले नाही. कसे ते पहा -
मुस्लिम संख्या अधिक असलेल्या कश्मीर व बंगाल मधील त्यांची वागणूक, रोहिंग्यांची व बांगलादेशातून होणारी घुसखोरी, पाकिस्तान व बांग्लादेश येथील अल्पसंख्याकांची होणारी छळवणूक, Demographic बदल ....
जसे अनेक शतकांमध्ये युरोप ख्रिश्चन झाला तशीच भारतातील इस्लामीकरणाची प्रक्रिया देखील लांबट आहे. गझनवीला अजून अकराशे वर्ष देखील झाली नाहीयेत. पुढील तीन चारशे वर्षात काय होईल हे सांगता येत नाही; त्यामुळे भविष्यात हिंदू धर्म जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे. आपला धर्म आपणच टिकवायचा आहे. त्यासाठी अन्य धर्मीयांशी संवाद, स्वसंरक्षण, धर्मज्ञान इत्यादी गोष्टी आपण करायला हव्यात.
● आता करतोय मुस्लिमांशी संवाद :
मुस्लिम बंधू-भगिनींनो; मी काही कडवा हिंदुत्ववादी नाही. मानवतावादी आहे. त्यामुळे मी तुमचा द्वेष करत नाही. माझा अल्लाह शी काही विरोध नाही. ईश्वर व अल्लाह एकच आहेत असा माझा अभ्यास आहे . परंतु तुम्हाला तसे वाटण्याची देखील गरज नाही.
मात्र मला जिहाद व तत् संबंधित विचारसरणी ही मोठी समस्या वाटते. आजही अनेक जण औरंगजेब, बाबर आदि बादशाहांचे समर्थन करताना दिसतात; त्यातून जी जिहादी मानसिकता वाढत आहे ती कोणाच्याच हिताची नाही.
बदललेल्या परिस्थितीमुळे भारत कधीही इस्लामी देश तर होणार नाहीच. पण इस्लामिझेशनची संकल्पना डोक्यात ठेवली तर होणाऱ्या सततच्या संघर्षामुळे प्रगती व शांततेला मात्र खीळ बसेल. शिवाय अगदी जरी इस्लामीकरण होईल असे मानले तरी देखील आपली स्थिती पाकिस्तानातील अवस्थेसारखी होईल.
म्हणूनच मित्रांनो आणि मैत्रिणींनो औरंगजेबाचा, जिहाद चा, गजवा ए हिंदचा तो मार्ग / विचार सोडून द्या...अगदी डोक्यातून देखील काढून टाका.
सर्वांनी मिळून शांततेत राहून प्रगती करूया. यातच सर्वांचे भले आहे. असे आवाहन मी तुम्हाला करीत आहे.
■ सर्व धर्मीयांसाठी एक उपसंहार - कोणत्याही चुकीच्या मार्गांनी जगात आपल्या धर्माचा प्रसार करणे हे योग्य नव्हे, माणुसकीला धरून नव्हे.
धर्म हे माणसाला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी असतात, जोरजबरदस्ती करून राजसत्ता वा धर्म सत्ता स्थापन करण्यासाठी नव्हे. हे लक्षात घेऊन सर्व धर्मियांनी ते सर्व मार्ग पूर्णपणे सोडून देण्याची वेळ आलेली आहे . दुसऱ्यांचे धर्म देखील माणुसकीची शिकवणूक देतात. देत नसतील तर ती त्यांनी स्वतःहून झुगारून दिली पाहिजे. त्यासाठी तुमच्या धर्माकडून कोणतीच जबरदस्ती नसावी. नव्या जागतिक शांततेचे व प्रगतीचे मार्ग यातूनच खुलणार आहेत. त्यामुळे सर्वांना नव्या जगासाठी नव्या वर्षी हा नवा संकल्प करण्याचे आवाहन करून मी येथे थांबतो.
संकल्प Slogan :
" हेवेदावे, जोर जबरदस्ती सोडून देऊया, एक होऊया आणि नवे जग घडवूया. "
आपला,
डॉक्टर प्रसाद फाटक पुणे.
Comments