सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान
सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान 'अवकाशातून मानवी हेवेदावे क्षुद्र वाटतात. अंतराळ प्रवासाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा तुम्ही अवकाशातून पृथ्वीकडे 'एक ग्रह' म्हणून पाहता, तेव्हा मानवी हेवेदावे किंवा मतभेद किती क्षुद्र आहेत, याची जाणीव होते,' अशी भावना अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी व्यक्त केली. 'जेव्हा तुम्ही अंतराळात पोहोचता, तेव्हा प्रत्येकजण हेच करतो, आपण सगळे आपले घर शोधू लागतो. माझे वडील भारतातील आहेत, तर माझी आई स्लोव्हेनियाची आहे. त्यामुळे साहजिकच मी ही दोन्ही ठिकाणे शोधत असते, ज्यांना मी घर म्हणू शकते आणि हेच तुमचे पहिले उद्दिष्ट असते,' असे त्या म्हणाल्या. मात्र पुढे 'ही सुरुवातीची 'आपले घर शोधण्याची भावना' हळूहळू पृथ्वीच्या एकतेच्या जाणिवेत बदलते,' असेही त्यांनी अधोरेखित केले. 'खरे सांगायचे तर मला असे वाटले की कुठल्याही गोष्टीवर कोणी भांडावेच का? मी लग्न केलेले आहे. मला नवरा आहे. आमच्यात भांडणे होतात. त्यामुळे वाद कसे असतात, हे मला समजते; परंतु प्रत्यक्षात असे का, ...