विचारांनी पुष्कळ गोष्टी बदलतात.
■ विचारांनी पुष्कळ गोष्टी बदलतात; म्हणून आपण आपल्या विचारांवर काम करणे खूप गरजेचे आहे. 1● व्यक्ती जीवनात विचार : चांगला विचार केला की चांगली ध्येय दिसू लागतात आणि त्यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन माणसं जीवनात यश, सुख व समाधान मिळवतात. दुर्विचारी माणसे सुद्धा हल्ली यशस्वी होताना दिसतात पण त्यांची कृत्ये त्यांना सतत काळजीत ठेवतात. एक फार मोठा यशस्वी गुंड होता तो मारला गेला. दुसरा आणखीनच यशस्वी होता तो पुढारी झाला पण घराबाहेर पडताना त्याला भीतीच्या छायेखाली खूप काय काय करावे लागायचे असे कळले. कुणाला ED तर कोणाला कसली भीती. त्यापेक्षा सामान्य माणूस खूप सुखी. 2 ● देशाच्या जीवनात विचार : हिटलर एका देशाला स्वाभिमानाने जगण्यास घेऊन गेला खरा पण पुढे विचार घसरले आणि सर्वनाश झाला. पुढे जर्मनीला सावरायला तर वेळ लागलाच पण अजूनही जखमा पूर्ण भरल्या असे म्हणता येणार नाही. 3 ● धर्म जीवनात विचार : अनेक मुस्लिम विचारवंत देखील सांगतात की भारत पाक आदि अनेक देशातील मदरसे जिहादी शिकवण देत आहेत त्यातून वाढणारा आतंकवाद निम्म्या जगात अशांतता माजवतोय. गैर मुस्लिम तर भोगत आहेतच शिवाय पाकिस्तान अफगा...