वाढत्या आत्महत्या भयावह. increasing suicides is deep concern.
आत्महत्यांचं प्रमाण आज देखील भयावह आहे.
आत्महत्येचा फोल पणा म्हणजे ती किती चुकीची आहे हे दर्शवणारि एक घटना करोना काळात मी वाचली होती - एक व्यक्ती टेन्शन मध्ये होता. त्याला ताप खोकला झाला म्हणून करोना टेस्ट केली पण तो स्वतःला सांभाळू शकला नाही..आणि त्याने आत्महत्या केली.😪
दैवाचा खेळ असा की दुसऱ्या दिवशी त्याचा टेस्ट रिपोर्ट आला आणि तो negative होता!
समस्या नसतात आणि असे व्यर्थ भय असते.
किंवा समस्या असल्या तरी पेशंस नसतो. त्या समस्येमुळे आपण जगाचा शेवटच गाठला असे वाटते; आणि माणूस दरीत उडी मारतो.
पण प्रत्यक्षात तो शेवट नसतो; ती समस्या उद्या सुटणार असते. पुढचे जीवन चांगले असणं अगदी नक्की शक्य आहे. त्यामुळे पेशंस वाढवायचे. स्वतःला संपवायचं नाही.
[ माझ्याशी तुमच्या पैकी कोणीही केव्हाही बोलून मन मोकळं करू शकता. ]
डॉ. प्रसाद फाटक पुणे 9822697288
पोस्ट वरील फोटो चा एक अर्थ: आज काळरात्र असली तरी उद्या लख्ख उजेड पडू शकतो.
Comments