Posts

Showing posts from February, 2025

तीन चित्रांमध्ये मानवतेची दोन अंगे.

Image
मानवतेची दोन अंगे आहेत. ● १. एक अंग म्हणजे चांगले असणे, वागणे - पहिल्या चित्रात त्याचे एक उत्तम उदाहरण आहे -  मल्टी टॅलेंटेड स्वानंदीचा युट्युब चॅनेल व त्यावरील कमेंट्स. One World. ● २. दुसरे अंग म्हणजे सर्व सीमा पार करून, भेदाभेद मनात देखील न आणता एकत्र येणे, खेळणे व मैत्र जुळणे. [ माझा   मुलगा या दुसर्‍या चित्रात आहे; ही गोष्ट मला अभिमानास्पद आहे. 😊 ]  Won world another angle -  ● ३. तिसऱ्या चित्रात तुम्हाला दिसेल की स्वामी विवेकानंद ब्रिटिशांबद्दल काय म्हणाले होते. ते म्हणतात की; " माझ्या मनात ब्रिटिशांबद्दल अत्यंत घृणा होती ; मात्र त्यांना भेटल्यानंतर माझे पूर्ण मतपरिवर्तन झाले. मी त्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो ! " राज्य करणारे क्रूर ब्रिटिश म्हणजेच सर्व ब्रिटिश नव्हेत हे त्यांच्या लक्षात आले. Don't count people in plurals हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. धन्यवाद.  🙏 

मानव-समाज व विश्व बंधुता

Image
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे. ' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर  किंबहुना चराचर आपणची झाला. ' हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.  प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?  तर त्यावर असे आहे की,  ' विनाशय च दुष्कृतां ' अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे. 🕉️ 🙏

मानवतेची महागाथा. Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेलास काय ? ...

मानवता के विचार संग्रह हिन्दी ...मानवता thoughts compilation in Hindi

Image
1 विश्व की सारी समस्या अति स्वार्थ बुद्धि से दूसरों को तकलीफ देना और उनका शोषण करना । इस कारण सारी समस्या पैदा हुई है । उसका एकमात्र जवाब मानवता है - जो सिखाता है कि दूसरों को तकलीफ नहीं देना है । दूसरों का शोषण नहीं करना है । दूसरों के ऊपर अनैतिक दबाव नहीं बनाना है । इसलिए मानवता सभी धर्मों से ऊपर है। उलटा मानवता ही वह कारण है जिसके कारण धर्मों का निर्माण हुआ।  देखें कैसे:  ■ शुरुआती दौर में हम जानवरों की तरह ही रह रहे थे। फिर हम अपने मस्तिष्क, भावनाओं और विचारों के कारण बड़े होने लगे। हम चाहते थे कि हम बेहतर इंसान बनें। कोई भी दूसरा जानवर बेहतर कुत्ता या बेहतर चिडिया बनने के बारे में नहीं सोचता! इसके विपरीत मनुष्य स्वार्थी उद्देश्यों के कारण कभी-कभी हम जानवरों से भी बदतर हो जाते हैं।  ■ दोनों कारणों से मानवता के विचार / आचार की आवश्यकता हुई । अलग-अलग संस्कृतियों और अलग-अलग धर्मों ने लोगों को बेहतर इंसान बनाने का काम अपने हाथ में लिया। तो इसमें सबसे पहले क्या आया है यह स्पष्ट है! कुछ धर्म इस काम में बेहतर हो सकते हैं और कुछ नहीं।  ■ इसलिए इस बात की पूरी संभावना है...