आतंकी हल्ला जातीय तेढ आणि भारत
■ पुलवामा नंतर नुकताच दिल्लीमध्ये मोठा आतंकी हल्ला होऊन दहाच्या वर मानवांची निर्घृण हत्या झाली. ही गोष्ट खूप संताप जनक आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे. ही कृत्य शिकल्या सवरलेल्या भारतातील मुसलमानांकडून झाली यामुळे अधिक संताप येणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर गेले बरेच दिवस दोन्ही बाजूंनी भयंकर समूह द्वेष व टोकाचे विचार आतून उकळताना दिसत आहेत हे एक मोठे गंभीर गोष्ट ध्यानात येत आहे. म्हणूनच आज आपल्याशी हा संवाद साधत आहे. ● केवळ संताप होऊन व एकमेकांवर नाराजी व्यक्त करून काम होणार नाही. यामागे असणारी मूळ कारणे शोधली व त्यावर उपाय केला तर ते जास्ती परिणामकारक ठरेल असे मला वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. ● विविध धर्मांची रचना माणसाला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी झाली हे खरे असले तरी सर्व धर्म सारखे नाहीत. जशी हाताची पाच बोटे भिन्न तसे वेगवेगळे धर्म ही भिन्न. अत्यंत पुरातन काळापासून अस्तित्वात आलेले हे धर्म असल्याने त्यांच्यात काही गुण व काही दोषही आहेत. धर्मचिकित्सा करून गुण वाढवायचे व दोष कमी करायचे हे आता आपणा सर्वांच्या हाती आहे. ● इस्लाम हा एक धर्म आहे आणि त्यात काही चांगल्य...