ब्राह्मण शाही/ पुरोहित शाही... जाती द्वेष आणि मानवता.
ब्राह्मण शाही / पुरोहित शाही :
■ महात्मा फुले व आंबेडकर यांच्या काळापासून ब्राह्मण, ब्राह्मण्य व पुरोहित यांच्या विरुद्ध बोलले गेले. काळानुसार त्यातील काही भाग योग्यच होता. परंतु परिस्थिती बदलली तरी देखील तो द्वेष आजही चालू आहे. नुसता द्वेष नव्हे तर शिवीगाळही होत आहे.
जर हे सगळे आजच्या घडीला बंद झालेले असते तर मी पुढे जे बोलतोय ते काहीच बोललो नसतो.
■ ब्राह्मणशाही, पुरोहितशाही हा जो विषय आहे तो असा आहे की; हे लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भोळ्या भाबड्यांना फसवतात, आर्थिक शोषण करतात.असा सामूहिक द्वेष आज देखील चालू आहे.
ते तितकंसं बरोबर न्हवते व नाही याचे काही पुरावे मी आपल्यासमोर ठेवतोय.
● दुसरा भाग असा की जमीनदार ब्राम्हण होते त्यांनी निश्चितपणे शोषण केलं... ब्राम्हणेतर जमीनदारांनी देखील तेच केलंय.
पण या सगळ्यांचा मुख्य विरोध आहे तो जमीनदार ब्राह्मणांपेक्षा पुरोहितांविरुद्ध जास्ती दिसतोय. म्हणून या पुरोहितांची / भटजींची स्थिती कशी होती हे सांगतो :
१● माझे खापर पंजोबा हे कोकणात खेड सारख्या गावी चरितार्थ चालवता येत नाही म्हणून स्वातंत्र्य समराच्या सुमाराला पुण्यामध्ये आले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार पुढे रेटला. 1840...
२● बर चला ही जुनी गोष्ट झाली. कोकणातल्या माझ्या दुसऱ्या एका आजोबांनी सांगितले की; हरिहरेश्वर सारख्या मोठ्या मंदिरातील भटजींना देखील दातावर मारायला देखील तांदूळ नव्हता. 1960...
३● हे ही जरा जुनं झालं. आमच्याकडे जे गुरुजी येतात ते गुरुजी जेव्हा भिक्षुकी सुरू केली त्यावेळी पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना कुटुंब चालवण्यात ओढाताण करावी लागत होती. 1985....
■ या सगळ्या उदाहरणांवरून भटजी किंवा पुरोहितांची आर्थिक स्थिती काय होती. अगदी अलीकडच्या काळापर्यंत काय होती; हे कळते. त्यामुळे त्यांनी समाजाला गंडवून भरपूर पैसा केला - हे धादांत खोटं आहे.
● धार्मिक बाबत ते कडक होते व त्या निमित्ताने अतिरेक झाला हे खरे आहे. परंतु त्यांची आर्थिक स्थिती ही अशी होती; हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय कित्येक वेळा ज्या भोळ्या भाबड्या जनतेला फसवले असे म्हणतात त्या भोळ्या भाबड्या जनतेचा त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता व वेळेला त्यांना गुरुजींचा खूप आधारही मिळत असे.
जे लोक एरवी बामण्या म्हणून चिडवायचे व दगड मारायचे तेच लोक अगदी आदराने नावरस वगैरे काढायला गुरुजींकडे येत असत हे मी पाहिले आहे. 1987...
■ तिसरा मुद्दा उच्चनीचतेचा त्याबाबत कोणी स्वतःला उच्च म्हणवून घेणे व दुसऱ्याला हीन लेखणे हे चूक होते, आहे व असेल याबद्दल शंका नाही. अस्पृश्यता ही तर सर्वात वाईट गोष्ट होती. हेही मी नक्कीच स्पष्ट पणाने सांगू इच्छितो.
● त्या वेळेला ते जन्माने श्रेष्ठ म्हणून उच्चतेचा भाव होता. ( superiority complex ) तर आज वेगवेगळ्या कारणाने / जाती व्यतिरिक्त कारणाने उच्चतेचा भाव सर्व जाती जमातीच्या लोकांमध्ये दिसतो आहे. आणि लगेच इतरांबद्दल हिनता भावही असतो.
● ब्राह्मण सोडून इतर जातींमध्ये देखील पूर्वी व आज अशा प्रकारचा उच्चतेचा भाव होता व आहे; हेही नमूद करावेसे वाटते.
म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हा वा. तो मानवतेच्या विरुद्ध आहे - कारण याच्यामध्ये मास हेट्रेट म्हणजे समूह द्वेष आहे.
● शिवाय या निमित्ताने सनातन धर्म, देवता, मूर्ती यांचे देखील अश्लाघ्य भाषेमध्ये निर्भत्सना चालू आहे. हेही माणुसकीच्या विरुद्ध आहे.
● जसे मुसलमानांना सांगतो की जिहाद हा विषय सोडून द्या. तसेच हा एक प्रकारचा जातीद्वेष, धर्मद्वेष आहे. तो सोडून द्या ही कळकळीची विनंती.
■ ब्राह्मण वर्गाने देखील आपला श्रेष्ठतेचा भाव मनातून काढून टाकून सर्वांप्रती आपुलकी ठेवणे आवश्यक आहे. हेच ब्रह्म जाणणे होय. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण.आणि ब्रह्म म्हणजे सर्वांचे एकत्व असेच आहे.
● सर्वांनी यावर विचार करून आपले मत बदलले तर एकात्म मानवता वादाच्या दिशेने एक पाऊल पडल्याशिवाय राहणार नाही.
■ आपला विनीत, डॉक्टर प्रसाद फाटक.
मानव जागरण मंच.
Comments