How could a one be a global Human ? ग्लोबल माणूस कसा ?
Love Humanity... How ?
मित्र-मैत्रिणींनो मी प्रसाद फाटक.
मी फाटक कुलसमिती चा मेम्बर आहे.
मी पक्का पुणेरी आहे.
मी ब्राह्मण संघाचा fb पेज चा मेम्बर आहे.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आजीवन सदस्य आहे. उपनिषदांचे तत्त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न करणारा मी एक पक्का हिंदू आहे.
मी भाजपचा नाममात्र का होईना सदस्य देखील आहे.
परंतु मी तिथे तिथे सदस्य असल्याने मी मानवतावादी असण्यात काही अडचण आहे अस मात्र बिलकुल नाही.
Explaining how is it reasonable to have it all in one person -
मानव जागरण मंच चा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे love all and that's all; is my moto.
मी फाटक कुळात आहे म्हणून शिंदे कुळाचा मला द्वेष नाही.
ब्राह्मण संघात आहे म्हणून माळी समाजाचा विरोधक नाही.
संघात असल्याने अहिंदू लोकांबद्दल मला द्वेष नाही.
मी भाजप चा मतदार असलो तरी मला गांधीजींचे ईश्वर अल्लाह तेरा नाम हे भजन आवडते.
बायबल कुराण गीता यांचा अभ्यास केल्यानंतर ' ऑल मायटी / All mighty ' हे एकच तत्व वेगवेगळ्या नावांनी नटले गेले असल्याचे कळते.
कम्युनिझम चा उदय का झाला हे देखील मी मॅक्सिम गॉर्की च्या ' आई ' या कादंबरी मधून समजू शकलो व मला ते पटले. ती पण त्या वेळेची एक गरजच होती; हे त्या चरित्रावरून लक्षात आले.
डायरी ऑफ अ यंग गर्ल - हिटलर च्या निर्दयी कॅम्प मध्ये मृत्यू पावलेल्या ॲना फ्रॅंक मध्ये मला माझी ॲना सारखी च वयाच्या 13 व्या वर्षीच मृत्यू पावलेली माझी सख्खी बहीण दिसते.
चार्ली चापलीन आईच्या इच्छे खातर सिनेमामधून ख्रिस्ताचा संदेश पसरवला व त्यात त्याने मानवतेचा पुरस्कार केला तो मला भावून गेला.
अफगाणी मुसलमान असलेल्या खालीद हुसैनि च्या ' द काइट रनर ' मधून मला मुसलमानांच्या देशातच पिडला गेलेला मुसलमान सामान्य माणूस दिसतो.
बाबासाहेबांच्या चरित्र व लढ्यातून दलितांची व्यथा कळते व भिडते.
आणि या सर्वांशी जोडला गेलेला मी केवळ पुण्यातला फाटक ब्राह्मण राहत नाही तर ग्लोबल ह्युमन होतो.
Actually I should rather say it right that : " I am a Global Hindu. "
Thanks for your kindness.
Comments