Indian Democracy facts. भारतीय लोकशाही चे वास्तव आणि उपाय
भारतीय लोकशाही ची सध्याची अवस्था : आज आपल्या लोकशाही ची अवस्था अतिशय बिकट आहे. म्हणजे असं की ती काही अगदी पाकिस्तान सारख्या अवस्था झालेली नाहीये हे नक्की. त्यांच्यापेक्षा नक्कीच बरे आहे; परंतु लोकशाही ज्या पद्धतीची हवी त्या पद्धतीची ही नाही. आपण जरी कितीही स्वतःची पाठ थोपटून घेतली तरीही लोकशाही आदर्श लोकशाही नक्कीच नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या लोकशाहीमध्ये 52 सालापासून ज्या प्रकारच्या घटना घडल्या त्याच या सगळ्याच्या मुळाशी आहेत. जर आपण काही पाश्चात्य उदाहरणे घेतली- उदाहरणार्थ इंग्लंड तर त्या ठिकाणी एकदा हुजूर पक्ष आणि एकदा मजूर पक्ष अशा प्रकारचं शासन बदलत असतं. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक यांच्यामध्ये शासन बदलत असतं. अशाच प्रकारे तुम्हाला आणखीनही काही पाश्चात्य देशात दिसेल. त्याच्या मागे त्यांचे तपश्चर्य आहे. आपल्याकडे तपश्चर्या करण्याऐवजी स्वातंत्र्यलढ्यात कार्य केल्याबद्दल जे काही एडवांटेज मिळालं त्याचा दुरुपयोग करून ती सत्ता कायम आपल्या हातात ठेवण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या. काही उदाहरणे देतो : मी स्वतः 45 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आ...