मानवता काय आहे v कशासाठी आहे ?
मानवता म्हणजे माणुसकी । मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट । मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही । मानवता म्हणजे स्त्री दलित गरीब कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागनुक देणे । मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही । मानवतेचा विरोध असतो - शोषक, भ्रष्टाचारी, रावण आणि दुर्योधन यांना ।। मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे । मानवता म्हणजे माझ्यातले दोष मी च आधी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनणे साठी सतत प्रयत्न करणे आणि तर करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे मानवता म्हणजे सत्य, प्रेम आणि करुणा बंधुभाव । ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे. साहित्यातून ही माणुसकी अंगी बाणायाची आहे ह्याची विस्मरण व्हायला नको. लेखक वाचकांनी हा धागा न सोडता ही खटपट चालू ठेवली तर साहित्य चळवळ प्रभावी होईल.