What if sanatan decreases and islam increases?
खालीद हुसेन यांचं द काइट रनर वाचल्यानंतर मी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या होत्या.
आता हे आणलंय. हे वाचल्यानंतर पुन्हा नवीन काही असले तर सांगेनच.
आजचा विषय असा की; अफगाणिस्तानातील आजची स्थिती काय आहे हे आपण पाहताच आहात. खालीद सारख्या मुसलमानांना जे सामान्य माणसासारखे जगू इच्छितात; त्यांना देखील किती सोसावं लागतं हेही आपण द काइट रनर या पुस्तकात पाहिलेच आहे.
अफगाणिस्तान म्हणजे पूर्वीचा आपला गांधार देश होता, अतिशय संपन्न होता, सुखी होता. इकडे ब्रह्मदेशापासून तिकडे गांधार पर्यंत आपला देश सनातन प्रधान होता. आणि जिथेजिथे धर्मांतराच्या माध्यमातून सनातन अल्पसंख्यांक झाला आणि मुस्लिम बहुल झाला तसंतसं भयानक स्थिती उत्पन्न झाली. आज अगदी संघ भाजपा विरोधी मित्रमंडळी देखील खाजगीत बोलतात की जर एकेक प्रांत मुस्लिम बहुल झाला तर पाकिस्तान अफगाणिस्तान सारखीच वाईट अवस्था होईल. हेही लक्षात घ्यायला हवे की तसे होत असताना तिथे राहणाऱ्या मुस्लिमांचे स्थिती सुद्धा अत्यंत बिकट होत जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे सनातन अल्पसंख्यांक व मुस्लिम बहुल होणे हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणासाठीच चांगले नाही. ही गोष्ट ध्यानात घ्यावी व त्याप्रमाणे त्या त्या धर्मीयांनी आपले वर्तन ठरवावे.
Comments