दोन वैद्यकीय सेवांची गोष्ट. डॉक्टर लोकांची गोष्ट.

रविवार ची गोष्ट २ वैद्यकीय सेवांची 
 दो बूंद सेवा की कीमत तुम क्या जानो आमदार बाबू ?💦
.... झालं असं की....
१● मी महाबळेश्वर जवळ मेटगुटाळ या गावी ट्रीप साठी गेलो असताना किरकोळ निमित्त होऊन लोखंड आणि माती अशा संबंधित जागेवर घसरून मला थोडी इजा झाली.
अशा वेळेला लगेच टीटी चे इंजेक्शन घेणे गरजेचे होते म्हणून शोधा शोध सुरू केली तर या गावी डॉक्टरच नाही. मग महाबळेश्वरांमध्ये गल्लीबोळामध्ये शोधून एक शिंदे डॉक्टर भेटले आणि त्यांनी टी टी चे इंजेक्शन दिले. त्यांनी सांगितलेल्या बिलाची अमाऊंट अगदी छोटी होती. बील चुकते केले आणि बाहेर पडताना इतके थँकफूल वाटले. अशा आडवळणी ठिकाणी त्यांनी दिलेली ही सेवा किती मूल्यवान आहे ! त्यांनी आणखीन जास्त सांगितले असते तरी काहीच वाटले नसते. 
●२ त्यानंतरची गोष्ट - तनुजाला काही त्रास होत होता. तिने डॉक्टर बिल्वा जोशी ( होमिओपॅथी ) यांना सल्ला विचारला. औषध इथेच कोपऱ्यावरून आणले तर ते अगदी स्वस्तात होते. आणि फोनवरून सल्ल्याची फी देखील त्यांनी जी सांगितली त्यापेक्षा कितीही जास्ती म्हणजे काही पट सांगितली असती तरी ती थोडीच होती असे वाटले. ☺️🙏
●३ मागे एकदा एका पेशंटच्या मुलाने त्याच्या आईला म्हंटले की, " डॉक्टर फाटक ऐवजी कोणातरी मोठ्या डॉक्टरला दाखवू या " तेव्हा मला थोडेसे वाईट वाटले व राग आला होता. मी त्यांना असे म्हणालो की, " वेळेला छोट्या आजारासाठी / कारणासाठी देखील डॉक्टर महत्त्वाचा असतो / ते त्यांच्यात छोटा मोठा काही नसते "
आणखी एक शरीर शास्त्र / वैद्यकाचं एक वास्तव असे की खरंच छोटी गोष्ट हे छोटीच असते असं नाही. जसं काट्याचा नायटा होणे किंवा समजा तुम्हाला कुत्रा चावला कि इंजेक्शन घेणे खूप छोटी गोष्ट वाटते; पण जर घेतलं नाही आणि जर तुम्ही उद्या भुंकायला लागला तर ती खूप मोठी गोष्ट आहे ⁉️. त्यामुळे असं एखादं काम छोटं नसतं. 
वेळेला वैद्यक सेवा महत्त्वाची याची वरील दोन गोष्टींमध्ये प्रचिती आली.
इकडे आपण म्हणतोय कि; शिंदे डॉक्टर व जोशी डॉक्टर यांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. आणि तिकडे आमदारांच्या सहाय्यकांचे काय चालले आहे ते तुम्हीच पहा म्हणजे झाले. 😫
डॉक्टर प्रसाद फाटक... ( आयुर्वेद )


Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

कलशारोहणं