Psychological health. mind health. marathi sahity.
अहंता गुणे सर्व ही दुख होते, मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते : By
Ramadas swami 1660 A D.Guru of great raja shivaji of maharshtra
Ramadas swami 1660 A D.Guru of great raja shivaji of maharshtra
meaning that ego is the cause of sorrow. If you pose to be very great the very knowledge is all waste
आपल्या ज्ञानाचा पैशाचा बुद्धीचा सौन्दर्याचा गर्व व त्याचा वारंवार उल्लेख माणसाला तात्कालिक आनंद तर देवून जातो. चार चौघात आपण फार वेगळे भारी वगैरे असल्याचा फील आपल्याला खूप सुखावतो देखिल पण त्यातील मी लई भारी ही गोष्ट नेमकी कोणाला तरी दुखावुन जाते आणि त्याचा अहंकार येतो आणि काही कारण नसताना एक आतल्या आत संघर्ष सुरु होतो तो आणखी विस्तारला की ओचाकारे काढणे सुरु होते आणि निर्माण होते दुख:. शिवाय आज तुम्ही क्र. १ वर आहात पण उद्या जर ती स्थिती नाही राहिली तर तो तुमचा अहंकार तुम्हाला स्वत:लाच कुरतडू लागतो आणि सुरु होते एक भयानक ओढाताण अन काहीली त्यातूनही दुख:च. म्हणुन अहंकार सोडा कष्ट करा मिळवा ते ईश्वराला अर्पण करा; दुसर्याचे गुण मान्य करा, स्वीकारा आणि सारेच जण सुखात रहा जय श्रीराम
meaning that our ego and its frequent public endorsement for wealth, knowledge, beauty may give us happiness for a moment we may feel great and different from others but it creates more and more ego. This may cause unnecessary jealousy to some body and then his or her ego hurts. then starts internal and then external fight between the 2 causing sorrow. Again today you are no. 1 but tomorrow if you lose the position it will cause inner injury to yourself subsequently causing rat race and unhappiness. So work hard get things thank the Almighty, accept the greatness of others and be happy. Jai shreeram
नको रे मना मत्सरू दंभ भारू
मत्सर हा आपल्याकडे ६ शत्रुंपैकी एक मानला आहे. अनेक तोटे आहेत. त्याने तुम्ही ज्याचा मत्सर करता त्याला फरक पडत नाही. मात्र तुमच्या जिवाला मात्र त्रास होतो. मग तुमचे लक्ष तुमच्या कामात लागत नाही आणि तुम्ही प्रगती करून त्याच्या बरोबरीला शक्यता पण दुरावते. शिवाय निसर्ग शक्ती जी भरभरून सारे काही देत असते तिला देखिल मत्सर काळातील तुमच्या नकारात्मक भावनाच तेवढ्या कळतात त्या कोणाबद्दल आहेत हे तिला कळत नाही म्हणुन ती देखिल तुम्हाला नकारच देते व तुमची प्रगती खुण्टते. क्वचित वाढीव मत्सर तुमच्या हातून समोरच्या व्यक्तीचे बरे वाइट करण्यापर्यंत घेवून जावू शकतो. म्हणुन मत्सर करू नको त्यापेक्षा ज्या योगे तो माणुस त्या पदाला पहा कर चुका दुरुस्त कर व स्वत:चे स्थान निर्माण कर रे 222मना!
Meaning that he mind do not be jealous about somebody. Jealousy will not make any difference to that person but on the contrary you will keep on hurting yourself then you may not concentrate on your work and very chance of your being able to achieve his position will also diminish. The nature power does not know to whome you are giving negative feelings and it will give that negative to you only subsequently you lose your prosperity. May be sometimes these negative feelings of jealousy may lead you to some unwanted act to other person. So no Jealousy try to know how that person sought that position correct yourself work hard and get whatever you want.
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची
धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही सांगा किंवा नको पण आचरा मात्र जरूर असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या न प्रसिद्ध कथेला नाव दिले होते आकाश माती म्हणजे प्रकृतीचा व सत्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.जसे प्रमेही [ diabetecic ] पुरुषाला गुलाब जामून ! मन म्हणते आणा सत्य असते थांबा आणि तो संघर्ष चालतो. धर्म हा सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो. तेरे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद हे तितके सोपे आहे का ? म्हणुन मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी एखाद्या बालकाप्रमाणे कधी आंजारून तर कधी कठोर होवून त्याला सरळ चांगल्या उपयोगी मार्गावर आणायला शिकवले आहे. तोच प्रयत्न करणे महत्वाचे. मग हे सांगायचे का तर तुम्हालाही जर हा मार्ग आवडला तर उपयोगी पडु शकेल म्हणुन! खरा आकाश मातीचा संघर्ष आत चालूच रहाणार अन एक दिवस सत्य विजयी होवून आनंदच आनंद पसरून जीवन पूर्ण होणार.
यथा योग्य प्रमाणात आहार लैंगिकता योग्य मार्गाने मिळणारे धन लागतेच पण अन्यथा मार्गाने अति हव्यासाने ओढुन घेतले तर ते चुकीचे व सर्वांनाच हानेकारक म्हणुन विषय वासना ताब्यात ठेवायला स्वामीजी सांगतात त न ऐकल्यास दुर्धर व्याधी होवू शकतात. पर स्त्रीवर आक्रमण केल्याने कायद्याच्या कचाट्यात जनी सर्वची ची होवू शकते .
मना त्वांची रे पूर्व संचित केले, घडे भोगणे सर्व ही प्राप्त झाले.
मना त्वांची रे पूर्व संचित केले, घडे भोगणे सर्व ही प्राप्त झाले.
अरे मित्रा, हे माझ्याच वाट्याला का? असे म्हणुन तू कधी शोक केला आहेस का ? तर नक्कीच प्रत्येकाने केव्हा तरी ह्या प्रश्नावर माथेफोड केली असणार. उत्तर काही सापडत नाही; मग पुन्हा पुन्हा तेच विचार अन जिवाला त्रास. त्याचे सर्वांसाठी उत्तर देवून ठवले आहे ते म्हणजे पूर्व कर्म. ते या जन्मीचे ठीक आहे पण मागल्या जन्मीचे काही माहीत नसते म्हणुन उत्तर सापडत नाही. अन गत जन्मीचे म्हंटल्यावर चटकन विश्वास बसत नाही . पण काही गोष्टी साधू संत म्हणतात म्हणुन ऐकाव्यात. तसेही आपण आधुनिक साधू संत म्हणजे शास्त्रज्ञांचे मानतोच ना ? ते कुठे सगळे आपण प्रयोग करत बसतो ?
तर हे पूर्व कर्म भोगावेच लागते कोणाला इथे कोणाला नन्तर पण भोगणे तर आहेच. चांगले केले चांगले मिळेल, वाइट केले वाईट मिळेल. ते भोगूनच सम्पणार. आता आधी केले ते केले; पुढे मात्र लक्षात ठेवायचे अन चांगले वागायचे; जेणे करून पुढे सुख लाभेल.
एक उश्शाप आहे ईश्वर प्रणिधानाने [ नाम किंवा ध्यान ] पूर्व कर्मांचा दोष घालवता येतो. अर्थात त्याच बरोबर नवे सत्कर्म हवे नाहीतर दुष्कर्म करत राहेले तर इकडे हौद भारत आहे तिकडे नळ सोडुन ठेवला आहे असे गणित व्हायचे !
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना क्रोध हा खेदकारी
हे मना क्रोध आवर. आम्ही स्वत:ला अन मुलांना म्हणतो कंट्रोल यार कंट्रोल. किंवा पूर्वी १०० आकडे मोजायला साङ्गायचो. किंवा राम राम म्हणायचो. क्रोधाचे अनेक तोटे आहेत सर्वात महत्वाचा आहे शारीरिक त्याने आपले बीपी वाढते पित्त वाढते [ खवळते ] हृदय धडधडू लागते नासा फुगतात चेहेरा लाल होतो. किती नको असलेली भावना असते ती शरीराला अन मनाला देखिल ! ९९% वेळा बहर ओसरला कि आपल्याला वाटते उगीच रागावलो राव आपण ! म्हणजेच खेद भले तो प्रकट करा कि करू नका ! बरं एवढे त्रास स्वत: सोसून पुन्हा ज्या कारणासाठी आपण एवढे तापलो ते साध्य होत नाही कारण समोरची व्यक्तीपण तापते ती तुमचे ऐकणे सोडाच उलट ती तुमच्यावर तापते आणि नुसत्या दोन्हीकडून अग्नीमध्ये काड्याच पडत रहातात. मग असा हा क्रोध आवरायला नको का ? शिवाय त्याने दीर्घ कालीन तोट्यात बीपी चा आजार व मानसिक आजार संभवतात ते वेगळेच. प्रसंगी अत्यंत आततायी कृत्ये देखिल त्याने माणुस करून बसतो जसे आत्मघात खून इ. म्हणून समर्थ म्हणतात नको रे बाबा तो क्रोध!
Comments