Bapoo sachchaa policevala ek vyaktichitr
सच्चा पोलिस वाला बापू बापु दामलेची भेट हा खरे तर एक विलक्शण अभिमानाचा विषय.या भेटीत अर्थात कोणताही योगायोग नव्हे कारण ही भेट म्हणजे जन्मजात ओळखच म्हणावी असे अतुट बन्धन! एकाच गल्लीत लहानाचे मोठे होणार्या मुलान्ची मैत्री अत्यन्त नैसर्गिक असते,त्यात कोठलाही दिखावा नसतो, स्वत:ला कोणितरी भारी वेगळी व्यक्ति असल्याचे भासवण्याचा खटाटोप नसतो,बालपणीच्या अनन्त कडू गोड आठवणी असतात. धमाल असते, भान्डणे असतात,पहील्या वहिल्या चुका असतात.बापु त्याचा मोठा भाउ बाळु मी आणि माझा धाकटा भाउ ही म्हणजे एक पक्कि चौकडी होती. त्यात भर पडता पडता एक पूर्ण india ची cricket team तयार होवुन गेली.भरपूर खेळणे,पोहायला जाणे, लाम्ब लाम्ब सायकलवर फिरायला जाणे,चित्रपट पहायला जाणे अश सगळ्य गोष्टी बरोबरच होत असत. एकमेकान्शिवाय करमत नसे. बापु आणि मी आम्ही दोघे अगदी देवभोळे होतो त्यामुळे बर्याच वेळा आमचा देव्हारा मान्डून देव देव खेळ देखिल चालत असे. बापुच्या घरची परिस्थिति काही कारणाने एकदम ढासळली होती.आइ वडील अत्यन्त सज्जन आणि स्वाभिमानी कोणापुढे हात पसरायचा नाही हे पहिले ब्रिद. आइने ४ घरची पोळ्यान्ची कामे सुरु के...