समूह द्वेष अगदीच वाईट.
ईश्वराच्या दरबारात अफाट आकाशाखाली, या दूरवर न संपणाऱ्या जमिनीवर सगळे जग एक आहे. कुठल्याही जाती, प्रांत, धर्म वा भाषा च्या लोकांबद्दल एका गठ्ठ्याने द्वेष करू नका. एखाद्या जातीतील / धर्मातील चुकीच्या वागणाऱ्या लोकांबद्दल विरोध असणे योग्य; परंतु अख्खी जात किंवा अख्खा धर्मच वाईट असे समजणे हे अत्यंत चुकीचे आहे. एका समूहातील सर्व माणसे कधीही सारखे नसतात दोन सख्खे भाऊ देखील सारखे नसतात. काहीजण मात्र एखाद्या जातीचा, एखाद्या धर्माचा अख्खाच्या अख्खा द्वेष करण्यात मश्गुल आहेत. बदलावे हे विचार.