Posts

Showing posts from November, 2023

अध्यात्म आणि सांसारिक इच्छाशक्ती

Image
एका पेशंटला अध्यात्म विषयक माहिती हवी होती म्हणून देत होतो. सगळं ऐकल्यावर त्याला आवडलं पण त्याने एक प्रश्न विचारला की; ' सर हे केल्याने माझी सेक्स ची इच्छा तर नाही ना जाणार ⁉️ '  मी म्हणलं की;  'अरे भाई काही घाबरू नकोस. डोंगरा एवढं जरी अध्यात्म केलंस तरी देखील हीच काय पण कुठलीच इच्छा इतक्या सहजपणे नष्ट होत नसते. छान आणि आवश्यक तेवढी मर्यादा आली तरी बास झालं. ' 😀  ज्यांना हा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी थोडक्यात बोलतोय. त्यांना फार मोठं lecture काही आवडणार नाही ना म्हणून ‼️😂

दिपावली शुभकामनाये

Image
इस दिवाली ईश्वर आपको *सुख समृद्धि और समाधान* की सौगात प्रदान करें  ।  डॉ. प्रसाद और तनुजा फाटक.

भारत हिंदुराष्ट्र आहे ❓

Image
⚛️ 1.भारत हे हिंदुराष्ट्र आहे ⁉️ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्ताजी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा दाखल देत भारत हे हिंदुराष्ट्र होते, आहे व असेल असा उद्घोष केला आहे. डॉक्टर साहेबांनी देखील हा उद्घोष केला होता हे ही सत्य आहे. तसेच हिंदुस्थान हे देखील भारताचे च नाव आहे हे ही सत्य आहे.  पण.... जर इतिहास व वर्तमानाचा मागोवा घेतला तर मात्र काही वेगळे वास्तव समोर येईल. ऐतिहासिक काळात देखील येथे हिंदू बाहुल्य होते. परंतु जरी ते या मातीतीलच धर्म असले तरी येथे बौद्ध व जैन हे वेगळे धर्म होते व त्यांचे जनलोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते. कित्येक बौद्ध व जैन यांना हिंदू धर्माबद्दल आस्था व काही हिंदू रीतिरिवाज पाळणे किंवा हिंदू दैवतं पुजणे हे घडतही आले आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक मिश्रण जगभरात सर्वत्र होत असते. परंतु हे दोन्ही धर्म पूर्णतः स्वतंत्र धर्मच राहिले आहेत. त्यांनी आपले अस्तित्व कधीही हिंदू धर्मात विलीन केलेले न्हवते आणि नाही. म्हणजेच पूर्वीदेखील भारत हा अनेक धर्मीय देश होता. नंतर मात्र बाहेरून आले ते मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमक. त्यांचा विस्तारव...