उन्हाळा आला महाबळेश्वर ला चला
Repost. Read if you missed it and *re read if you read it.* It is soul soothing kind one : उन्हाळा आला की मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागायच्या म्हणून आपली ट्रिप देखील उन्हाळ्यातच करायची आपल्याला सवय होऊन गेली. टूर्स अँड ट्रॅव्हल्स चां हा काळ. त्यातून पुणे मुंबई नागपूर सारखे ठिकाणा गर्मीने हाहाकार मग काय चला महाबळेश्वर पाचगणी असही असायचं. असाच एक रम्य अनुभव : ( निबंध format ) *तुका म्हणे होय मनासी संवाद* - ट्रिपचा नुसता विषय निघाला तरी सगळेजण आनंदित होऊन जातात. मरगळलेले लोक देखील उत्साहाने बोलू लागतात. त्यातून उन्हाळा असेल तर जीवाची काहिली झाल्याने शहरा बाहेर पडण्याची देखील तीव्र इच्छा असतेच. मग जवळच्या जवळ म्हणून महाबळेश्वर-पाचगणी किंवा जमलं तर उटी मनाली अशा अनेक ट्रीप्स आपल्या निघतात. मला आणि माझ्या कुटुंबाला देखील अशा सहलींचे भारी आवड. सहलीला गेलं की मन कसं प्रसन्न होऊन जातं. या सहली मधील अनेक अनुभव सगळी मित्रमंडळी मैत्रिणी लिहितीलच. ते वातावरण अनेक जणांच्या लिहिण्यात येईल दिवसभर ठीक ठिकाणी विशेष पॉईंट्स असतात तिथली गर्दी पाहता हा सर्वांचा आवडीचा विषय कसा आहे हेही कळू...