Hindutwa today
आजच्या काळानुसार हिंदुत्वाची व्याख्या करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. हि व्याख्या देशाच्या भवितव्यासाठी विशेष उपयोगी पडेल असे निश्चितपणे म्हणता येईल. हिंदू धर्म आणि त्यावर आधारलेली हिंदू संस्कृती अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे.हि संस्कृती अत्यंत भक्कम असल्याकारणाने ती अनेक आक्रमणे व आव्हानांना तोंड देवून उभी राहू शकली असे दिसून येते. जेरुसलेम जवळ निघालेले २ धर्म आक्रमण करीत एकाने पश्चिम तर दुसर्याने पूर्व काबीज करीत गेले पण ते हिंदुस्थान ला पूर्ण पणे बदलू शकले नाहीत यामागे नेमके हेच कारण असावे. तरीदेखील राजकीय आणि धार्मिक आक्रमणात आपण आपले स्वातंत्र्य वारंवार गमावून बसलो त्यामागे काय कारण असेल? १. सुबत्तेमुळे आलेला गाफिलपणा - हा देश सुजलाम सुफलाम निसर्गाचं वरदान असल्याने विपरीत स्थितीला तोंड देण्याचे प्रसंग कमी, त्यामुळे एक प्रकारचा आळशीपणा व गाफिलपणा आपल्यात आला होता. २. काही कारणांनी निर्माण केलेल्या जातीव्यवस्थेने इतके टोक गाठले कि जातीभेद हा देशाच्या एकसंधतेला आलेली मोठी बाधा ठरली. जातीपातीत विभागलेला देश एकत्रित पणे आक्रमकांना तोंडच देवू शकला नाही. ३. ...