Hindutwa today

आजच्या काळानुसार हिंदुत्वाची व्याख्या करणे हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. हि व्याख्या देशाच्या भवितव्यासाठी विशेष उपयोगी पडेल असे निश्चितपणे म्हणता येईल.
हिंदू धर्म आणि त्यावर आधारलेली हिंदू संस्कृती अत्यंत प्राचीन अशी संस्कृती आहे.हि संस्कृती अत्यंत भक्कम असल्याकारणाने ती अनेक आक्रमणे व आव्हानांना तोंड देवून उभी राहू शकली असे दिसून येते.
जेरुसलेम जवळ निघालेले २ धर्म आक्रमण करीत एकाने पश्चिम तर दुसर्याने पूर्व काबीज करीत गेले पण ते हिंदुस्थान ला पूर्ण पणे बदलू शकले नाहीत यामागे नेमके हेच कारण असावे.
तरीदेखील राजकीय आणि धार्मिक आक्रमणात आपण आपले स्वातंत्र्य वारंवार गमावून बसलो त्यामागे काय कारण असेल?
१. सुबत्तेमुळे आलेला गाफिलपणा - हा देश सुजलाम सुफलाम निसर्गाचं वरदान असल्याने विपरीत स्थितीला तोंड देण्याचे प्रसंग कमी, त्यामुळे एक प्रकारचा आळशीपणा व गाफिलपणा आपल्यात आला होता.
२. काही कारणांनी निर्माण केलेल्या जातीव्यवस्थेने इतके टोक गाठले कि जातीभेद हा देशाच्या एकसंधतेला आलेली मोठी बाधा ठरली. जातीपातीत विभागलेला देश एकत्रित पणे आक्रमकांना तोंडच देवू शकला नाही.
३. कर्मकांडांचा अतिरेक यामुळे एखाद्याचा धर्म बातवला कि अनेकजण त्याच्या बरोबर कायमचे हिंदुत्वाला मुकत असत.
४.विशेषतः इंग्रजांच्या काळात त्यांनी वापरलेल्या शस्त्रांना तोंड देणे देखील मुश्कील झाले.
पारतंत्र्याच्या काळात यावर विचार करून सावरकरांनी हिंदुत्वाची प्रथम व्याख्या केली त्यांनी या सर्व कारणांचा विचार करून हे दोष दूर करण्यासाठी प्रबोधन व संघटन केले. त्यांनी क्रांतीकारकांना देखील प्रोत्साहित केले प्रत्यक्ष हिंसेचा मार्ग देखील त्यांनी चोखाळला. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले असा त्यांचा रोकडा सवाल होता.
त्यानंतर डॉक्टर हेडगेवार हे मोठे हिंदू संघटक होवून गेले त्यांनी स्थापन केलेली RSS हि संघटना आजही जगभरात कार्यरत आहे . त्यांचा उद्देश विखुरलेला हिंदू समाज एकत्र करून नेहेमी येणाऱ्या परतन्त्र्यापासून या देशाची कायमची मुक्तता करणे असा होता. कलकत्त्यात क्रांतिकारक म्हणून काम करत असताना क्रांती मार्गाच्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग मुळीच पत्करला नाही. विशाल संघटनाने जी शक्ती उत्पन्न होईल त्यापुढे कोणीच टिकणार नाही हा त्यांचा विश्वास होता. अहिंदू अल्पसंख्यांच्या ते कधीही विरोधात नव्हते तसे त्यांनी अनेकदा स्पष्ट देखील केले. हि गोष्ट काहीवेळा संघाच्या लोकांच्या देखील विस्मरणात जाते ती मुळीच विसरता कामा नये. हिंदू संघटन म्हणजे जातीय हा विचार चुकीचा आहे तो या मुळेच. कोणत्याही गटात लोकं एकत्र येवू शकतात अट हि कि ते कोणाच्याही विरोधात असू नयेत.
आजच्या हिंदुत्वाचा विचार करता ह्या गोष्टीला खूप महत्व आहे कि हिंदूंचे संघटन कोठल्याही धर्मियांविरुद्ध असलेले संघटन असता कामा नये.अनेक अहिंदू मोठ्या निष्ठेने व प्रेमाने भारताच्या प्रगतीत सहभागी आहेत. प्रत्येक अहिंदू अतिरेकी किंवा धर्म परावर्तक [ बटवा बटावी करणारा ] नाही. अत्यंत सुसंस्कृत असे चांगल्या विचाराने भरलेले अहिंदू येथे आहेत व होते. नीच कर्मे करणारा हिंदू कधीही सद्वर्तनी अहिंदू पेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही! राज्य शकट हाकायचा झाल्यास तर विशेषतः अहिंदुना बरोबर घेवून प्रगतीचे भागीदार करून घ्यायला हवे. त्यांना समान न्याय मिळायला हवा. जसे मोठ्या महाराजांच्या काळात झाले तसे [छ शिवाजी महाराज ].अशा विचाराने केलेली कामे देशाच्या हिताला साधक होणार आहेत होतही आहेत. आजचे उदाहरण द्यायचे झाल्यास गुजराथ किंवा बिहार चे देता येईल.सर्व समावेशकता व कार्य प्रवणता हा या दोन्ही ठिकाणाचा मंत्र ठरला आहे.
अधुनिकता हा देखील आजच्या हिंदुत्वाला पूरक गुण ठरणारा गुण होय. यंत्र तंत्रांचा यथायोग्य वापर देशाच्या प्रगतीत कारणीभूत होत आहे. नव्या हिंदुत्वाचा त्याला विरोध असणार नाही हे बघावे
लागेल
ह्यापेक्षादेखील अति महत्वाचा मूळ विचार जर अंगी बाणला नाही तर वर उल्लेखलेली गुजराथ बिहार ची प्रगती देखील तात्पुरती ठरेल तो पुढीलप्रमाणे :
आजच्या काळात सर्वात मोठे आव्हान जे दिसते ते म्हणजे अति भोगवादामुळे उत्पन्न झालेले आधी व्याधी. यात शारीरिक मानसिक आजार तर आहेतच पण भ्रष्टाचार हि मोठी सामाजिक कीड कि देशाला रसातळाला घेवून चालली आहे ती देखील त्याचाच परिपाक आहे. अतिस्वार्थ, अति भोग, अति हाव यामुळे वरील ३ समस्या देशाला ग्रासून टाकत आहेत. हिंदू संस्कृती मध्ये यावर अतिशय मूलगामी उत्तरे आहेत. हि विचारसरणी आपल्याला अति भोगवादापासून दूर ठेवते वेदांतामधील एक अतिशय महत्वाचे तत्व ' तेन त्यक्तेन भून्जीथा ' म्हणजे त्यागपूर्वक भोग घ्या हे आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. हि संस्कृती प्रत्येकाला साधू व्हायला सांगत नाही. ती म्हणते त्यागपूर्वक भोग घ्या. दुसर्याचा विचार करून मग स्वतःचे पोट भरा. पोट फुतेस्तोपर्यंत खाऊ नका. दुसरे वेदात सांगितले आहे ते असे 'न जातु कामः कामाना उपभोग्येन शाम्यते' अर्थात भोगलालसा हि सतत वाढते ती भोग घेवून कधीच संपत नाही म्हणून तिच्यावर नेहेमी मर्यादा घाला. या मूलगामी विचारांवर उत्पन्न झालेली शास्त्रे योग आणि आयुर्वेद हे आता भारताबाहेर देखील लोकप्रिय होत आहेत त्याचे कारण अति भोगून देखील समाधान होत नाही हे त्यांच्या लक्षात येवू लागले आहे हेच असावे . सकारात्मकता, चैतन्य याची कास धरा, सतत मनाला चांगल्या विचारात ठेवा त्याने तुमचे जीवन आनंद मय होईल असे भगवद गीता सांगते. ईश्वर हि संकल्पना माना अगर मानू नका पण हे चैतन्य तर तुमच्या अनुभवला येते का ? जर परमेश्वर मानत असाल तर त्याला या सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून सतत डोळ्यासमोर ठेवा ज्यामुळे तुमची कृती शुद्ध व मन आनंदमय होईल.
हिंदुत्वाचा हा अर्थ आज आपली प्रत्येक व्यक्ती समाज व देशाला सर्वात महत्वाचा होवून बसला आहे असे मला वाटते .
स्वतःला बदला, एकत्र या आणि नवा भारत उभा करा हा या नव्या हिंदुत्वाचा व नव्या देश उभारणीचा महामंत्र ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast