Gopi
नेमके सांगायचे झाले तर १९८४ साली मी संघाची शाखा चालवण्यासाठी गुरुवार पेठेतल्या एका गल्लीत जायला सुरुवात केली. अत्यंत मागासलेला असा हा एक भाग होता. बावन बोळ असे त्या भागाचे नाव म्हणजे इतक्या बारीक बारीक गल्ल्या एकातून दुसर्या फुटणार्या कि बाहेर पडणेच मुश्कील व्हावे. जंगलात जसा चकवा लागतो म्हणतात ना तसा लागायचा. ह्या बावन बोळात काही थोडेच लोकं संघाचे होते आणि मुख्य पगडा कॉंग्रेस वाल्यांचा. एकंदर लोकं गरीब, कमी शिकलेले आणि मेहेनत मजुरी करणारे. एखादे बेकार तरुणांचे टोळके कायम तिथे असणाऱ्या एका देवळाच्या पायऱ्यांवर बसलेले असे. शाखेत मुलांना तोटा नसे, भरपूर मुले पण एकापेक्षा एक अर्क, त्यांना शिस्त लावणे दूरच पण नुसते त्यांचे खेळ तासभर घ्यायचे म्हंटले तरी घाम फुटायचा. या आधीच्या शाखेत शिस्त लावण्यासाठी मुलाना फटका दिल्याने फारच समस्या झाल्या यामुळे इथे हात उचलायचा नाही असे मी ठरवलेलेच होते. त्यामुळे हे काम आणखीनच कठीण झाले, पण दुसर्या अर्थाने बरे झाले नाहीतर माझी काही धडगत नव्हती. एक दिवस गल्लीच्या बाहेरून दुसर्या जवळच्या गल्लीतून एक नवीनच मुलगा आमच्या शाखेत येवून हजा...