Delhi gang rape modern problems and humanity आधुनिक समस्या आणि मानव धर्म
आधुनिक समस्या आणि मानव धर्म
दिल्लीच्या सामुहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर ज्या प्रकारे तीव्र प्रतिक्रिया उठली त्यामुळे आधुनिक भारतातलेच नव्हे तर जगातले अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले.पत्रकार, विचारवंत या सर्वानीच या ढासळणार्या परिस्थितीची कारणे शोधण्यास सुरुवात केली. त्यांचा पुन्हा उहापोह करण्याचे येथे प्रयोजन नाही परंतु त्या विचारांचा उपयोग मात्र खुप झाला.
दिल्ली बलात्कार व खून हा एक अक्षम्य गुन्हा आहे.बीड येथे डोक्टर सुदाम मुंडे याने स्त्री भ्रुणुहत्येचा घातलेला रतीब, ती भ्रुणु भरलेली विहीर व ते खाणारॆ त्याची २ कुत्री हा माणुसकीला काळीमा फासणारा अक्षम्य गुन्हा आहे.अमेरिकेत २० वर्षाच्या युवकाने शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार करत १५ अश्राप विद्यार्थ्यांचा घेतलेला बळी हा काळजाचे पाणीपाणी करणारा अक्षम्य गुन्हाच आहे.
दिल्लीच्या घटनेवर एवढा उद्रेक झाला तरी तश्या अनेक घटनांची मालिका चालू रहाते हा निर्लज्यपणाचा कळस आहे.काही पत्रकारांनी १० देशातील स्त्रीविरुद्ध अत्याचारांचा अभ्यास केला असता असे आढळून आले कि अशा गुन्ह्यांमध्ये भारताच्या बरोबरीने अमेरिका इंग्लंड औस्ट्रेलिआ हे देश देखिल फार काही मागे नाहीत. प्रगत वाढत्या सुखसोयिनि युक्त आपलं जग खरं तर किती सुखी, किती सुरक्षित असायला हवं ? पण दुर्दैवाने तसे नाहीये.
गुन्हेगारी पूर्वी न्हवती का ? होती पण त्यामागे मुख्य कारणे रोजी रोटी चा प्रश्न होता.कधी तो गुन्हेगार टोळ्यांमध्ये सापडत असेल पण हे काहीतरी भलतच चाललय.आजचा हा गुन्हेगार सुशिक्षित, संपन्न वर्गातला देखिल आहे. मग तो इथला IT वाला असेल कि अमेरिकेतला धनिक पुत्र असेल. ह्यांच प्रमाण खूप वाढतंय. सगळं काही असून देखिल का हि माणसं अशी विकृत होतात ? इतकी नृशंस होतात ?
युवकांच्या आत्महत्यांचा अभ्यास करणार्या एका गटाला असं आढळून आलं कि बंगळूरू हे शहर कि जिथे IT क्षेत्रातली वाढ अत्यंत वेगाने होत आहे; तिथे ह्या घटना सर्वाधिक प्रमाणात घडत आहेत. तिथला शिकलेला तरुण व चांगला पगार असलेला तरुण देखिल असामाधान व तणाव तसेच नैराश्य यातून हे कृत्य करत आहे !
माणसाच्या ज्ञात इतिहासाकडे बारकाईने पाहिले असता हे कळते कि दगडाची हत्यारे बनवण्यापासून [ अश्म युग ] मानवाची सातत्याने भौतिक द्रुश्ट्या प्रगतीच झाली आहे. आधी हजारो वर्ष हळुहळु होणारी ही प्रगती युरोपात झालेल्या ओद्योगिक क्रांतीनंतर ती एकदम वेगात होऊ लागली आणि अमेरिकेत अलिकडे झालेल्या संगणक क्रांती ने तीत अनेक पट वाढ आणली.या प्रगतीमुळे जगभरातल्या माणसाचे कष्ट कमी झाले. त्याच्या रोटी कपडा मकान व त्याकरीता लागणारा पैसा ह्या गरजा भागण्यास त्याची मदत झालॆ, शिवाय दळण वळणाची सुविधा जगास जोडुन गेली. जग हे जणु एक खेडं भासू लागला. जगाचा काही भाग तर फारच चकाचक दिसू लागला. या सगळ्यामुळे हे बदल पूर्व \ पश्चिम सार्या जगानेच सानंद स्वीकारले.
जरी आजदेखील काही वर्ग नित्य गरजाना वंचित असला तरी एक मोठा वर्ग मात्र सुस्थित होऊन देखिल पुढे ' अजून हवे ' [ Have more ] च्या अवस्थेत पोचला आहे. जे मिळाले त्यात समाधान ठेवून प्रगती न शोधता अजून हवे हे असमाधानाने म्हंटले जाऊ लागले. पैसा, आहार, लैंगिक सुख, घर दार कशातच समाधान नाही अशी अवस्था झाली. माणुस म्हणुन आपल्या गरजा भागावाव्यात, कष्ट करावे, कमवावे व उपभोग घ्यावा यात कुठेच अमानुषता नाही. पण अजून हवे हवे करता करता समाजात अशी भावना कि आता कमावून न्हवे तर दुसर्याचे ओढुन घ्या आणि आणखी मिळवा. ह्यातून वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी फोफावते आहे - जसे भ्रष्ट मार्गाने धन कमावणे, असमाधानाने स्वत:चाच जीव देणे, लैंगिक सुखासाठी बलात्कार, फसवाफसवी आणि हे सारे काही . इथे मानवातून प्रकटत आहे दानव. त्या राक्षसांनी त्या कोवळ्या पोरी कडुन ओरबाडून घेतले लैंगिक सुख, त्या दानवाने पैशासाठी पोरींचे कोवळे भ्रुणु चिरडून टाकले, त्या तरुणाने सर्व भौतिक सुविधा असून कुठल्याशा अनामिक अस्वस्थेतून केले विद्यार्थांचे खून. [ अशा घटना अमेरिकेत वारंवार घडत आहेत हे येथे लक्षणीय आहे एखादी घटना असती तर ते वेडेपणाचे कृत्य म्हंटले असते].सार्या सुखसोयींनी युक्त हे जग त्यामुळे unsafe, अस्वस्थ, दुख्खी झाले आहे.
हे सर्व पाहिल्यावर एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते ती म्हणजे धर्म. या अमानुशपणावर खरी मात्रा ' माणुस धर्माची' असणार हे स्वाभाविक आहे. काय म्हणतो हा मानव धर्म किंवा ही मानवता ?
१. दुसर्याचे धन संपत्ती अन्न स्त्री आदी ओढुन न घेणे. २ स्त्री पुरुष लहान मोठा ह्या जातीचा \ धर्माचा त्या जातीचा \ धर्माचा असा भेद करून त्याना वाइट हीन वागणुक न देणे.
ही मानवता वाढीस लागली कि अनेक गोष्टी सुधारतील जसे वर्तणूक, परस्पर संबंध, स्वछ्छ कारभार वगैरे. आणि त्यातून होईल नव्या आनंदी समाजाची. कसा जागवणार हा माणुस धर्म ? एक: प्रत्येकाची स्वत:शी जबर इछ्छाशक्ति, कुटुंबातील संस्कार, आणि आपापल्या धर्मानी सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि दोन : जर त्यात काही हिणकस असेल तर ते दूर सारण्याची तयारी.
आपण मगाशी मानवाचा भौतिक प्रगतीचा इतिहास पाहिला आता थोडा धार्मिक इतिहास पाहू या. जसा माणुस विचार करू लागला तसे त्याने सर्वान्साठी काही साधे नियम, कानून बनवले आणी नंतर त्यांच्यातील काही विचारवंतानी समाजाच्या संपूर्ण सुखाचा विचार सुरु केला आणी त्यातून उदयाला आली तत्वान्याने आणि धर्म. माणसाला माणुसपण यावे व तो सुखी व्हावा हीच इछ्छा सर्व धर्म स्थापकानी उरी बाळगली होती.काही मुख्य धर्मांचा विचार केला असता ते आपल्या सहज लक्षात येईल.भौतिक प्रगती होत असूनही सुख मिळत नाही हे सत्य तेव्हा ही होतेच. या सर्वानी ते ओळखलं आणी म्हंटलं की बाबानो नुसते भौतिक प्रगतीच्या मागे लागून सुख मिळणार नाही. ते समाधान, ते सुख आपल्या अंतर्यामीच आहे.ते मिळवण्यासाठी बाहेरचा हव्यास सोडा आणि आतल्या आनंदमय कोषाला जागवा कोणि त्याला ईश्वर, अल्लाह, God म्हंटलं तर कोणी निरीश्वर वाद्यांनी त्याला मौनातल सुख मानलं [ जसे निरीश्वर वादि बुद्ध इ. ]. यामुळे मुख्य गोष्ट ही झाली कि माणसाचा नैसर्गिक ओढा असलेल्या भौतिक गोष्टीतून तो थोडा बाहेर राहिल्याने त्याची हव्यासाची संभाव्य घसरण थांबली आणि एक balance उत्पन्न झाला.शरीराची मागणी तर नैसर्गिक होय पण जर १० जिलब्या खाण्याच सुख एक खावून लाभलं तर ? किंवा एखाद्या वेळी न च मिळाली तरी लाभलं तर ? असा एक balance \ self control यातून माणुस शिकू लागला.जर केवळ भौतिक लाभाच्या मागे लागला तर समाधान होत नाही आणि हव्यासातून घसरण सुरु होते. आज त्यामुळे भ्रष्टाचार प्रचंड वाढला आणि बलात्कार देखिल. जे लैंगिक साहित्य लपून छपून क्वचित पाहिले जाऊ शकत होते ते केव्हाही पाहील जातंय, अगदी सहज मोबाइल वर देखिल. मग मने बेकाबू होतात आणि कोणी असली कृत्य करतो. material मधुन immortal कडे नेणारे धर्म फक्त परस्परांशी भाण्डण्यापुरतेच राहिले.
बघा हे लोक काय सांगताहेत ते : येशू म्हणतो ' एका पेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध ठेवू नका.पैशाच्या मागे लागून गुणांकडे पाठ फिरवू नका. माझ्यावर प्रेम करा, शेजार्यावर प्रेम करा.' आपल्याकडे उपनिषदे उच्चारवाने सांगत आहेत ' न जातु काम: कामानां उपभोगेन शाम्यते ' उपभोग घेतल्याने भोगत्रुश्णा कधीच संपत नाही. ती भूक सतात वाढतच जाते म्हणुन त्यागपूर्वक भोग घ्या' साधू संत म्हणतात 'स्त्री पुत्र आदी करून फक्त न पाहता देवाचे नामस्मरण करा तर जीवनाचे सोने होईल' बुद्ध सांगतो ' हे सर्व शून्य क्षणभंगुर आहे याकडेच फक्त न बघता मौन होऊन आपल्या आत डोकावून बघा आणि परम शांती मिळवा ' जैन तीर्थंकर भोग तृष्णेच निर्वाण करायला सांगतात, जिभेवर ताबा मिळवायला सांगतात आणि त्यासाठी पर्युशणाचे महत्व सांगतात.
मग सर्व सामान्याना कदाचित हे तत्वन्यान अवघड जाइल म्हणून काही नीती नियम, पूजा अर्चा, सोपी व्रते वगैरे सांगितली, पाप पुण्याची भीती घातली. [ आज ती भीती पण नाही पण नाही आणि नीती पण नाही म्हणुन ही स्थिती ] त्यातूनच धर्मांची निर्मिती झाली.धर्म पाळणारा समाज असताना सारे काही आलबेल झाले न्हवते; तरी एक मर्यादा रहात होती, आतासारखा ताळतंत्र सुटला न्हवता. जो तो लुटतो दुसर्याला , लहानात लहान बालिकेवर बलात्कार अशी अत्यंत वाइट अवस्था न्हवती.
मानव धर्म सर्वोपरी ठेवला पाहिजे असे म्हणण्याचे कारण त्याने धर्मातील कलह टाळता येतील व दुसरे जे लोक देव धर्म मानत नाहीत त्याना देखिल सदाचरणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवता येईल. नको ना देव धर्म मग मानवता तरी अंगीकारा. तुम्हाला धर्माने सांगितलेल्या गोष्टींचा उपयोग नाही होणार पण कठोर इछ्छाशक्ति ,' कि मी चांगला माणूस बनेन दुसर्याला ओरबाडणार नाही ' ही तुम्हाला उपयोगी पडेल व ह्या परिस्थितीला आपण सामोरे जावू.आणि सर्वानी त्यासाठी नुसते विचार न्हावे तर काही त्याला पोषक असे वाचन, काही नियम असेही करावे लागेल. ते देखिल प्रत्येकाने तसेच स्वत:ची आचार संहिता करणे आवश्यक आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा कायदा व सुव्यवस्थेचा माणसाला निट वागण्यासाठी नीती बरोबरच भीतीची पण गरज असते व ती कायदा लावून उत्पन्न केली जाते आणी तो परिणामकारक हवाच पण पुन्हा तो करणारे, अम्मलबजावणी करणारे , शिक्षा देणारे हे सर्व लोकच आहेत व ते जर स्वार्थी व भ्रष्ट असतील जसे आज आहेत, तर काय उपयोग ? म्हणजे पुन्हा मानवता हा मुद्दा आलाच म्हणुन जर सर्वानी सुखाने राहायचे असेल तर सर्व धर्मियांनी व निधार्मियानी मिळुन मानवतेची कास धरली पाहिजे त्याने ह्या अंधार युगाचा शेवट होईल व सुखाचॆ पहाट उजाडेल व वेदांनी म्हंटल्याप्रमाणे सर्वेपि सुखिन: सन्तु हे धेय्य साध्य होईल.
Comments