Posts

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

लठ्ठपणा विषयी उपयुक्त माहीती चा लेख.

Image
लठ्ठपणाचा संपूर्ण विचार :  obesity / fat body / स्थौल्य / जाडी वाढणे / वजन वाढणे.. हे सगळे शब्द आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात / चर्चेत सतत येत असतात. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असल्यामुळे त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. वस्तुतः स्थूलता ही काही खूप मोठी समस्या आहे असा काही भाग नाही. कारण जाड असला म्हणजे अनफिट आणि बारीक असला म्हणजे फिट हे सुद्धा तितकसं बरोबर नाही. परंतु आयुष्यात पुढे लठ्ठपणामुळे काही गोष्टी मागे लागून आपल्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतात त्यामुळे फार लठ्ठ होऊ नये , झाला असले तर राहू नये हे अगदी नक्की. आम्ही केशव आयुर्वेदिक चिकित्सालयातर्फे पूर्वी लठ्ठपणा वरती काम सुरू केलं त्याच्यामध्ये आयुर्वेदाप्रमाणे निदान, सल्ला व चिकित्सा असं सगळं केलं. काही पंचकर्माचा भाग देखील करत असू. पण नंतर लक्षात आलं की एवढं काही पुरेसं नाहीये.....म्हणजे पंचकर्म वगैरे केलं की बारीक होतं असेही काही नाहीये; मग उगीच खोटं सांगून पैसे कशाला मिळवायचे? म्हणून मग आम्ही त्यावर काम करतो हे सांगणं बंद केलं.  मात्र रोजच्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला लठ्ठपणाचा विचार करावाच...

ब्राह्मण शाही/ पुरोहित शाही... जाती द्वेष आणि मानवता.

Image
ब्राह्मण शाही / पुरोहित शाही :  ■ महात्मा फुले व आंबेडकर यांच्या काळापासून ब्राह्मण, ब्राह्मण्य व पुरोहित यांच्या विरुद्ध बोलले गेले. काळानुसार त्यातील काही भाग योग्यच होता. परंतु परिस्थिती बदलली तरी देखील तो द्वेष आजही चालू आहे. नुसता द्वेष नव्हे तर शिवीगाळही होत आहे.   जर हे सगळे आजच्या घडीला बंद झालेले असते तर मी पुढे जे बोलतोय ते काहीच बोललो नसतो. ■ ब्राह्मणशाही, पुरोहितशाही हा जो विषय आहे तो असा आहे की; हे लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भोळ्या भाबड्यांना फसवतात, आर्थिक शोषण करतात. असा सामूहिक द्वेष आज देखील चालू आहे.  ते तितकंसं बरोबर न्हवते व नाही याचे काही पुरावे मी आपल्यासमोर ठेवतोय.    ● दुसरा भाग असा की जमीनदार ब्राम्हण होते त्यांनी निश्चितपणे शोषण केलं... ब्राम्हणेतर जमीनदारांनी देखील तेच केलंय.  पण या सगळ्यांचा मुख्य विरोध आहे तो जमीनदार ब्राह्मणांपेक्षा पुरोहितांविरुद्ध जास्ती दिसतोय. म्हणून या पुरोहितांची / भटजींची स्थिती कशी होती हे सांगतो : १● माझे खापर पंजोबा हे कोकणात खेड सारख्या गावी चरितार्थ चालवता येत नाही म्हणून स्वातंत...

The God particle. ईश्वर तत्त्व.

Image
The God particle.  ईश्वर वस्तु... आता इथे ईश्वर वस्तु असा शब्द वापरल्यामुळे काही जण नाराज होतील. परंतु खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी हा शब्द वापरलेला आहे. विषय वस्तु म्हणजे या जगातील सर्व भौतिक गोष्टी तर ईश्वर वस्तु म्हणजे ते परब्रम्ह परमात्मा चैतन्य असा विषय आहे. आज जगामध्ये अनेक लोक वेगाने नास्तिक होत आहेत. मुसलमानांना नास्तिक होणं सोपं आणि सोयीस्कर नसल्यामुळे ते एक्स मुस्लिम होत आहेत. या पार्श्वभूमीवर या ईश्वर वस्तु बद्दल बोलणं योग्य राहील. अर्थात जर कोणी नास्तिक असेल तर काही अडचण नाही. तो त्याचा विचार आहे. त्याला मी काही पाखंडी म्हणत नाही. मी त्याच्याविरुद्ध काही कमी अधिक करायची इच्छा ठेवत नाही. माझ्यासारख्या अनेकांशी जो ईश्वराचा संबंध येतो तो कशासाठी आहे? आणि त्याचा उपयोग काय आहे? एवढंच फक्त मी आपल्यासमोर ठेवणार आहे. काहींच्या मते ईश्वर हे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मानवाची कल्पना आहे. तर काहींच्या मध्ये ध्यानावस्थेत सापडलेले ते एक तत्त्व आहे. अर्थात या दोन्हीपैकी काहीही असलं तरी फारसा फरक पडत नाही. कारण ती एक कल्पना आहे असं मानायला जागा आहेच. आणि तो अनेकांचा प्रत्यक्ष अन...

Happy Rakshabandhan

Image
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा l स्वत:च्या आरोग्याचे, माणुसकीचे, पर्यावरणाचे, जगाचे रक्षण आपल्या सर्वांच्या हाती आहे.  चला आज संकल्प करूया. ☺️🕉️🙏  Reference Reading link :  मानवतेची महागाथा : https://prasad176phatak.blogspot.com/2025/02/humanity-thoughts-in-marathi.html Thx all.

मानवतेचा मूलमंत्र H35

Image
मानवता ही व्यक्तींसाठी सर्वोत्तम धोरण आहे, राष्ट्रांसाठी सर्वोत्तम राजनय आहे आणि धर्मांसाठी सर्वोत्तम आदर्श आहे. ती शांती आणि प्रगतीचा महामार्ग आहे. ती जगा आणि जगू द्या या तत्त्वापेक्षा दुसरे काहीही नाही. सर्वांचा आदर करा. प्रामाणिक रहा. स्वतः रहा. फसवणूक करू नका, भ्रष्टाचार करू नका, आर्थिक शोषण करू नका, जबरदस्तीने किंवा फसवे धर्मांतर करू नका. अन्याय करू नका.... सर्वांना ते आचरणात आणू द्या. सर्व भाषा बोलणाऱ्यांसाठी गट: https://www.facebook.com/groups/175611265799218/?ref=share&mibextid=NSMWBT इंग्रजी पोस्टसाठी ब्लॉग: http://prasad176phatak.blogspot.com/search?q=Humanity+&m=1

मानवता का मूलमंत्र H34

Image
मानवता व्यक्तियों के लिए सर्वोत्तम नीति, देशों के लिए सर्वोत्तम कूटनीति और धर्मों के लिए सर्वोत्तम आदर्श है। यही शांति और प्रगति का राजमार्ग है। यह कुछ और नहीं, बल्कि जियो और जीने दो का सिद्धांत है। सभी का सम्मान करो। ईमानदार रहो। स्वयं बनो। कोई धोखाधड़ी नहीं, कोई भ्रष्टाचार नहीं, कोई आर्थिक शोषण नहीं, कोई जबरन या धोखे से धर्मांतरण नहीं। कोई अन्याय नहीं.... इसे सभी अपनाएँ। सभी भाषा बोलने वालों के लिए समूह: https://www.facebook.com/groups/175611265799218/?ref=share&mibextid=NSMWBT  अंग्रेजी पोस्ट के लिए ब्लॉग: http://prasad176phatak.blogspot.com/search?q=Humanity+&m=1