Posts

उत्सव नात्यांचा?

Image
उत्सव नात्यांचा? :  ● ' झी मराठी, उत्सव नात्यांचा ' ही स्लोगन आपण रोज ऐकतो. पण प्रत्यक्षात मात्र आपल्या अवतीभवती बघितलं तर नात्यांचा ' येळकोट' च झालेला आहे. ¤ 'मी मराठी, येळकोट नात्यांचा! ' अशी अवस्था झाली आहे. ● संवादाचा अभाव, अहंकार, सॉरी चा अभाव, आळस, स्वार्थ, पैशाचा हव्यास, कोतेपणा... ¤ पूर्वी मी आणि माझं कुटुंब एवढं च बघायचे आता मी आणि फक्त मी एवढेच पाहिले जाते आहे. ● ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे आज पूर्वी कधी नसेल एवढी नात्यांची अवस्था बिकट झाली आहे.  ● संस्कारांचा अभाव हे कारण इथे लागू होत नाही. कारण जिथे खूप चांगले संस्कार झालेत असे माझ्या पिढीतले लोक सुद्धा या गर्दिश मध्ये आहेत! ● विचार विमार्षासाठी जारी केलं आहे. ~ प्रसाद फाटक पुणे.  9822697288

रंग उधळू चला. 🔷️ 🟩 🟤 🔶️

Image
वाचक हो; अनेकदा तुमच्या कमेंट्स वरून शंका येते म्हणून ही विनंती करतोय की कृपया कोणी मला judge करू नका, आणि मुख्य म्हणजे दांभिक ठरवू नका.  रोमान्स / स्पिरिचुआलिटी याबद्दल माझे वेगळे विचार आहेत. 28 Sept 2021 च्या या पोस्टमध्ये त्याची झलक तुम्हाला दिसेल. 😊🙏 Repost :  आयुष्याला रंग हवा, बहुरंग हवा ।  आव्हानांचा, तिखट कडू आठवणींचा  काळाकुट्ट हवा । आकाशाचा, विशालतेचा निळाशार हवा । मधुर रोमान्स चा गोड गुलाबी हवा । फेसाळत्या उत्साहाचा पांढराशुभ्र हवा । आवडत्या पदार्थांचा, अन्नदात्या शेतांचा हिरवागार हवा । समुद्राचा, गहराई चा गडद निळा हवा । कष्टाचा, घामाचा जल रंग हवा । सोन्याचा, समृद्धीचा चमकता सोनेरी पिवळा जर्द हवा ।  त्यागाचा, दुसऱ्यासाठी झिजण्याचा भगवा हवा । आणि रंगुनी रंगात ह्या साऱ्या... अखेर प्रभु चरणी समर्पिततेचा विठू सावळा पण हवाच हवा ।। डॉ प्रसाद फाटक पुणे. 28 सप्टेंबर 21 9822697288

Can you Love all?

Image
' खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ' या साने गुरुजींच्या शिकवणुकीय नुसार आपण पुढे जायला बघतोय खरं पण भवतीची माणसं ही सर्वांवर प्रेम करण्यासारखे राहिली आहेत का? हा प्रश्न मनासमोर उभा राहतो. ' गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढरं बरी ' अशी अवस्था झालेली आहे! असं लक्षात येतं की स्वार्थ,अहंकार ऐशो आराम यासाठी आणि मुख्य म्हणजे बेशिस्त / मनाला पाहिजे तसं वागायचं यासाठी माणसं काय वाटेल ते करताहेत. श्वान प्रेमींची माफी मागून असे म्हणता येईल की आपण कुत्र्यांसारखं किंवा त्यांच्यापेक्षाही पुढच्या टोकाचे वागतोय कि काय?  अर्थात हे सर्व च्या सर्व लोकांसाठी लागू नाहीच पण हे खूप येणाऱ्या अनुभवांची गोळा बेरीज आहे. रस्त्यात कचरा टाकणे, सिग्नल तोडणे, किरकोळ गोष्टीवरून अंगावर धावून जाणं, अरेरावी वगैरे, स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्याच्या ताटातला घास ओढून घेणं, लोकांच्या दारात गाड्या लावणे, रात्री अपरात्री हवा तसा आवाज करणं, सार्वजनिक ठिकाणी रोमांस करणे, व्यसनाधीनता ह्या अगदी सहज अवतीभवतीच्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत.  आमदार, खासदार, मंत्री लोक काय करतात त्...

आयुर्वेद दिन

Image
चलो आयुर्वेद की राह पर चलते हैं l आयुर्वेदिक जीवनशैली, चिकित्सा व औषधीयां हमारे स्वास्थ्य के लिये बहुत महत्वपूर्ण और उपयुक्त है l धन्यवाद जिन्होंने इस राह में हमें चुना l धन्यवाद केंद्र सरकार जिन्होंने इसका महत्व उजागर और अधोरेखित किया l ♥️ 🙏

मनाचे व्यायाम

Image
मनाला देखील व्यायाम लागतो याचा बहुतेक सर्वांना विसर पडतो. तो या पहिल्या कागदावर लिहिला आहे. आम्ही आमच्या शिवानंद प्रबोध मंडळ या संस्थेमध्ये दर आठवड्याला याचा सराव करायचो; तो सराव आज देखील अनेकांना उपयोगी पडत आहे. ओम नमः शिवाय. 🙏 🕉  धन्यवाद.

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....