Posts

Showing posts from September, 2023

गणेश प्रतिष्ठापना

Image
श्री. गणपती प्रतिष्ठापना करताना जाणवते की आपल्या कडे परब्रम्ह परमात्मा यासंबंधी जे प्रचंड व्यापक विचार आहेत ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपण एका पार्थिव मूर्तीत ओततो. म्हणजे च की त्या मातीच्या मूर्तीत आपण परब्रम्ह तत्व प्रस्थापित करतो / कल्पितो. त्यालाच प्रतिष्ठापना असे म्हणतात. तसेही ते तत्व जळी स्थळी काष्ठी पाषाणी असतेच. पण आपल्या लाडक्या मूर्तीत ते पहायला सोपे जाते. अर्थात हे समजून पूजा करायला हवी तर च होईल.     अथर्वशीर्षात पण लिहिले आहे की हे गणेशा तूच साक्षात आत्मा आहेस. ऋषी मुनींनी मूर्तिपूजेच्या माध्यमातून आपल्याला मूळ तत्व कळायला किती सोप्पे केले आहे नाही का ?  🕉 वैद्य प्रसाद फाटक ९८२२६९७२८८