Posts

Showing posts with the label देव

देव काही करत नाही.

Image

देव काहीही करत नाही.

Image
आज एक गोष्ट मोकळेपणाने बोलणार आहे.  ● देव काहीही करत नाही ●  तो फक्त सगळं व्यापून राहीलेला असतो.  आणि देव / परब्रम्ह ही " कल्पना "आपल्याला खूप समृद्ध करून जाते.   ● मग कोण काय करतं? देव करत नाही तर कोण करतं ? हा प्रश्न आहे.  त्याचे उत्तर असे की आपण आपले काम चोख करत राहायचे. त्या उपर काही गोष्टी ना आपल्या हातात, ना देवाच्या, ना कोणाच्याच हातात असतात.  ● त्याबाबत फक्त आपला दृष्टिकोन बदलायचा आणि पुढे जायचे. Chat GPT काहीवेळा त्यासाठी काही छान छान उपयोगी गोष्टी सांगतो बरं का!

देव देव धर्म हिंदू मुस्लीम ? Prosperity Vs Religious matters:

Image
सध्याच्या काळात आपली सगळी शक्ती ही प्रगती ऐवजी, शास्त्रीय शोध, नवीन नवीन शोध लावणे वगैरे गोष्टी ऐवजी धर्माच्या गोष्टींमध्ये चालली आहे. असा एक अगदी यथायोग्य मुद्दा एकाने परवा काढला. आपलं सध्या देव, धर्म, हिंदुत्वासंबंधीच्या चळवळी हेच जास्त सगळं चालू आहे?  तो तसे पाहता काही अंशी खरंच बोलला असं म्हणायला हरकत नाही. त्यावर माझा एक छोटासा विचार असा की खरोखरीच पूर्वीच्या काळी आपण भौतिक दृष्ट्या किती समृद्ध होतो, जगातल्या सर्वश्रेष्ठ इकॉनॉमि पैकी होतो. जगातला 1/5 th आर्थिक उलाढाल हिस्सा दक्षिण अशियाचा होता... हे बरोबर आहे. पण मग हे सगळं मागे का पडलं?  याचं खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे परकीय आक्रमण आणि त्याचबरोबर त्यांनी केलेला धर्मावरचा हल्ला... त्यामुळे धर्म वाचवण्यासाठी भरपूर शक्ती खर्च होत गेली. धर्म संहार नसता तर आपल्याला आपला धर्म मंदिरापुरता किंवा आपल्या घरापुरता ठेवून भौतिक प्रगती कडे पण लक्ष देता आले असते. दुसरं कारण असं की; ज्यामध्ये मूळ धर्म हा अंतर्बाह्य उत्कर्षाला महत्त्व देत होता. इशावास्य उपनिषदात ते कसे स्पष्ट सांगितले आहे; हे यापूर्वी मी लिहिले व बोललो आहे. पण ...

महास्त्री व महापुरुष यांचे आदर्श

Image
महास्त्री महापुरुष यांचे आदर्श - मी नावाप्रमाणे प्रसाद म्हणजे काही गोष्टींसाठी साद घालणारा माणूस आहे. इतर आमच्या कुळातले लोक फाटक अडणावाप्रमाणे नाहीयेत; पण मी मात्र  अडणावाप्रमाणे फाटका माणूस आहे.😂 म्हणून मी अधिक चांगला माणूस बनायचे ठरवतो आणि त्यासाठी मला साहित्य, संगीत, धर्म, अध्यात्म, घरचे संस्कार टिकवणे आणि महापुरुष व महास्त्रियांचे जीवन चरित्र  या गोष्टी उपयोगी पडतात. मित्र मैत्रीणींनो; तुम्हाला जर असे मानवाचे आदर्श पाहून स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर माझ्या पुढील विचारांवर 👉 पण एकदा नजर टाका. 🙏 एखादे चरित्र ऐतिहासिक असो की पुराणातील वा कुराणातील असो ; त्यातून काहीना काही मिळतेच. ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि लक्षात हे ठेवायचे की ती देखील माणसेच आहेत. त्यांच्या गोष्टी आपण माणुसकीच्या भूमिकेवर घासून बघायच्या. आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल / पटेल ते पण बघायचं, त्यातलं एक एक घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करायचा. दत्तगुरूंनी तर 108 गुरू केले. तसे पदोपदी चांगले असेल ते वेचत जायचे. एक सोपे उदाहरण देतो : आता व्यसनांचे जे काही स्वरूप झालेय ते ...