महास्त्री व महापुरुष यांचे आदर्श

महास्त्री महापुरुष यांचे आदर्श -
मी नावाप्रमाणे प्रसाद म्हणजे काही गोष्टींसाठी साद घालणारा माणूस आहे. इतर आमच्या कुळातले लोक फाटक अडणावाप्रमाणे नाहीयेत; पण मी मात्र  अडणावाप्रमाणे फाटका माणूस आहे.😂
म्हणून मी अधिक चांगला माणूस बनायचे ठरवतो आणि त्यासाठी मला साहित्य, संगीत, धर्म, अध्यात्म, घरचे संस्कार टिकवणे आणि महापुरुष व महास्त्रियांचे जीवन चरित्र  या गोष्टी उपयोगी पडतात.
मित्र मैत्रीणींनो; तुम्हाला जर असे मानवाचे आदर्श पाहून स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर माझ्या पुढील विचारांवर 👉 पण एकदा नजर टाका. 🙏
एखादे चरित्र ऐतिहासिक असो की पुराणातील वा कुराणातील असो ; त्यातून काहीना काही मिळतेच. ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि लक्षात हे ठेवायचे की ती देखील माणसेच आहेत. त्यांच्या गोष्टी आपण माणुसकीच्या भूमिकेवर घासून बघायच्या. आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल / पटेल ते पण बघायचं, त्यातलं एक एक घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करायचा.
दत्तगुरूंनी तर 108 गुरू केले. तसे पदोपदी चांगले असेल ते वेचत जायचे.
एक सोपे उदाहरण देतो : आता व्यसनांचे जे काही स्वरूप झालेय ते पहाता हे हास्यास्पद वाटेल; पण आम्हाला लहानपणी ज्येष्ठ असे सांगत असत की, ' टिळकांचे ४ गुण घ्या... नुसते त्यांच्या सुपारीच्या व्यसनावर बोट ठेऊ नका.'😄
या 2/3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातून आपण कुठेतरी कणभर बरे व्यक्ती होऊ शकू.
आपला, डॉ प्रसाद फाटक पुणे 2. 
फोन : 9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.