Can you Love all?
' खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ' या साने गुरुजींच्या शिकवणुकीय नुसार आपण पुढे जायला बघतोय खरं पण भवतीची माणसं ही सर्वांवर प्रेम करण्यासारखे राहिली आहेत का? हा प्रश्न मनासमोर उभा राहतो.
' गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढरं बरी ' अशी अवस्था झालेली आहे!
असं लक्षात येतं की स्वार्थ,अहंकार ऐशो आराम यासाठी आणि मुख्य म्हणजे बेशिस्त / मनाला पाहिजे तसं वागायचं यासाठी माणसं काय वाटेल ते करताहेत.
श्वान प्रेमींची माफी मागून असे म्हणता येईल की आपण कुत्र्यांसारखं किंवा त्यांच्यापेक्षाही पुढच्या टोकाचे वागतोय कि काय?
अर्थात हे सर्व च्या सर्व लोकांसाठी लागू नाहीच पण हे खूप येणाऱ्या अनुभवांची गोळा बेरीज आहे. रस्त्यात कचरा टाकणे, सिग्नल तोडणे, किरकोळ गोष्टीवरून अंगावर धावून जाणं, अरेरावी वगैरे, स्वातंत्र्याच्या नावाखाली दुसऱ्यांना त्रास देणे, दुसऱ्याच्या ताटातला घास ओढून घेणं, लोकांच्या दारात गाड्या लावणे, रात्री अपरात्री हवा तसा आवाज करणं, सार्वजनिक ठिकाणी रोमांस करणे, व्यसनाधीनता ह्या अगदी सहज अवतीभवतीच्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत.
आमदार, खासदार, मंत्री लोक काय करतात त्यावर हे काही बोललोच नाहीये... ते तर रावण / दुर्योधनाच्या गतीला जाऊन बसलेत.भले मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. त्यांचा तर विषयच बाजूला ठेवूया.
तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठेतरी चुकतंय? आणि आपण बदलायला हवंय?
तसं जर झालं तर सौहार्द व सर्वाभूती प्रेम या गोष्टी शक्य होतील.
अन्यथा तशीही नाती विसविशित झाली आहेत. जाती जातींमध्ये मनभेद वाढला आहे.
या सगळ्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो.
Comments