रंग उधळू चला. 🔷️ 🟩 🟤 🔶️
वाचक हो; अनेकदा तुमच्या कमेंट्स वरून शंका येते म्हणून ही विनंती करतोय की कृपया कोणी मला judge करू नका, आणि मुख्य म्हणजे दांभिक ठरवू नका.
रोमान्स / स्पिरिचुआलिटी याबद्दल माझे वेगळे विचार आहेत.
28 Sept 2021 च्या या पोस्टमध्ये त्याची झलक तुम्हाला दिसेल.
😊🙏
Repost :
आयुष्याला रंग हवा, बहुरंग हवा ।
आव्हानांचा, तिखट कडू आठवणींचा
काळाकुट्ट हवा ।
आकाशाचा, विशालतेचा निळाशार हवा ।
मधुर रोमान्स चा गोड गुलाबी हवा ।
फेसाळत्या उत्साहाचा पांढराशुभ्र हवा ।
आवडत्या पदार्थांचा, अन्नदात्या शेतांचा हिरवागार हवा ।
समुद्राचा, गहराई चा गडद निळा हवा ।
कष्टाचा, घामाचा जल रंग हवा ।
सोन्याचा, समृद्धीचा चमकता सोनेरी पिवळा जर्द हवा ।
त्यागाचा, दुसऱ्यासाठी झिजण्याचा भगवा हवा ।
आणि रंगुनी रंगात ह्या साऱ्या...
अखेर प्रभु चरणी समर्पिततेचा विठू सावळा पण हवाच हवा ।।
डॉ प्रसाद फाटक पुणे. 28 सप्टेंबर 21
9822697288
Comments