हिंदुत्वाचे वारे की वावटळ?
हिंदुत्वाचे वारे की वावटळ?
■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.
● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते.
● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे.
● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे.
हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे.
● फोटो २ ~ आज संघप्रमुख मोहनराव भागवत म्हणत आहेत ते असे की; आपला धर्म हा समावेशक आहे, हार्मनी निर्माण करणारा आहे. मात्र दुसऱ्या स्तरावर स्वयंसेवकांची मानसिकता वेगळी आहे आणि तिसरा स्तर म्हणजे वरील प्रकारे वर्तन करणारा समाजाचा भाग! मला वाटतं की; हिंदूंची मानसिकता टोकाला जाणार नाही... हे बघण्याचे काम समंजस हिंदूंचे व संघाच्या स्वयंसेवक / कार्यकर्त्यांचे आहे.
● फोटो ३ ~ तीन रंगांची होळी आनंदोत्सव करणारी ठरावी जाळणारी नको.
प्रसाद फाटक पुणे.
Comments