माणुसकी आणि धर्म. नास्तिक व मानवता
■ नुकताच फ्रॅंकफर्ट - शिकागो या विमानाने प्रवास करत होतो. त्यावेळेला मला एक पोलंडचा माणूस भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या तेव्हा तो म्हणाला की; ' मी नास्तिक आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळ्या प्रकारचे अनाचार पाहून मी स्वतःला सर्वाच्या बाहेर करून घेतले. '
● मग आमच्या मानवतेबद्दलही काही गोष्टी झाल्या. त्यावेळी त्यांनी एक खूप छान विधान केलं की;
" जर तुम्हाला चांगला माणूस बनायचं असेल तर तुम्हाला धर्माची अथवा देवाची काहीच गरज नाही. "
खरंच किती छान वाक्य आहे! याआधी मी सुद्धा बोललेलो आहे. परंतु मी एक धार्मिक माणूस असल्यामुळे मी बोलण्यापेक्षा त्या नास्तिक पोलीश माणसाचं हे बोलणं जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणून इथे कोट केलं.
■ मग प्रश्न असा येतो की -
मानवते संबंधी बोलते लिहीत असताना अनेकदा धर्मांचा उल्लेख होतो त्याचा काय अर्थ काढायचा ? धर्माशिवाय जर माणुसकी वाढू शकते. तर मग धर्माचा सतत उल्लेख कशाला हवा ?
□ त्याच्यामागे एक चांगलं आणि एक वाईट अशी दोन कारणं आहेत.
● 1 एक चांगलं कारण असं की मुळात आपण मागे लिहिल्याप्रमाणे; मानवता विकसित व्हावी म्हणूनच धर्म निर्माण झाले. मग या धर्मांनी माणसाला माणुसकीचे धडे दिले. आजही खूप मोठा मानवी वर्ग धर्मांना मानतो. म्हणून जर धर्मांची चांगली / योग्य शिकवणूक ह्या सर्व धर्माच्या मानवांनी अनुसरली तर मानवतेला मोठा भरीव असा पाठिंबा मिळेल.
[ मानवता तरी कशासाठी तर सगळं जग सुखी समाधानी आणि संपन्न व्हावं यासाठी. ]
- ह्या चांगल्या कारणासाठी
आपण धर्मांचा उल्लेख करतो. की खऱ्या अर्थाने धार्मिक बना.
●2 एका नकारात्मक कारणासाठी पण धर्म उल्लेख करावा लागतो - जे धर्म माणुसकी साठी निर्माण झाले; त्यांच्या झगड्यातूनच प्रचंड रक्तपात झालाय.करोडो माणसे मरण पावली. आता देखील तेच चालू आहे. तुम्ही तुमच्या धर्माची चांगलीच शिकवणूक घेतली आणि नकारात्मक भाग दूर केला तरच तो धर्म जगाच्या उपयोगाचा असणार आहे. आपल्या धर्मामध्ये देखील सुधारणा केली व तो नीट अनुसरला तर तो जगाच्या शांततेसाठी उपयोगी होणार आहे.
¤ दुसऱ्या धर्माचा द्वेष, आपल्याच धर्मात सर्व जग आले पाहिजे असा अट्टाहास आणि आपल्या धर्माचेच जगावर राज्य असावे - या साऱ्या गोष्टी सोडून आपल्याला पुढे यावं लागणार आहे.
■■ अशा या दोन कारणांनी आपल्या बोलण्यात माणुसकी च्या बोलण्यात धर्म येतो.
● आणि उर्वरित जे कुठलाच धर्म मानणारे नाहीत अशांचे जी प्रचंड संख्या आहे त्यांना स्वतःला अधिक चांगला माणूस बनवणे नक्कीच शक्य आहे.
☆ त्यासाठी दुसऱ्यावर अनैतिक सत्ता गाजवण्याची, दुसऱ्यावर सत्ता गाजवून त्याचे शोषण करण्याची ओढ, जग जिंकण्यासाठी आक्रमणे, दुसरा देश जिंकण्यासाठी आक्रमणे. किंवा
☆ व्यक्तिगत लेव्हलवर स्वतःच्या स्वार्थापोटी व हव्यासापोटी दुसऱ्यांना अडचणीत आणणे, त्यांचे ओढून घेणे या गोष्टी बंद करणे.
प्रामाणिक काम करून प्रगती करणे, दुसऱ्यांचा विचार करून उत्तम जगणे - अशा विविध आचरणातून धार्मिक असा किंवा नसा तुम्ही जास्त चांगला माणूस बनू शकता.
Comments