Happiness A marathi \ English poem by me sukh the happiness

सुख माझे…………………
सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे नक्की काय असतं ?
ते मिळवण्यासाठी आधी पैसा मिळवावा लागतो त्याशिवाय ते हाती लागत नाही.
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते होतं बाळाच्या खुदकन हसण्यात, तेव्हा मी इन्ग्लन्ड च्या प्रोजेक्टवर होतो आणि नेट वर ते नेटाने बघत होतो.
पण छ्या त्या फ़ेस पुस्तकावर ते बघणं म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखंच होतं! ॥ १ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते होतं भरपुर कष्ट केल्यावर जमिनिवर अन्ग टाकण्यात, पण तेव्हा मला उद्याची कामं आठवायची -
आणी अगदी गरीबात गरीबाला पैश्याशिवाय मिळणार्या त्या सुखाला मी अन्तरायचो.
स्वप्नात सुद्धा मला अगदी उद्याची डेड लाइन डेड करुन टाकायची ! ॥ २ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते होतं बायकोने हातात पाण्याची बाटली देत हळुच नजरेने फ़्लाइन्ग किस देण्यात -
पण छ्या ती तर माझ्याआधीच पळालेली असायची, तिच्या डेड लाइन्स गाठायला! ॥ ३ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते असतं अगदी मोकळ्या आवाजात, खरं तर तार स्वरात गायलेल्या आवडीच्या गाण्यात
कोणि काही म्हणलंच तर पुलन्चा सन्वाद म्हणायचा ," भिमसेन बरा गातो म्हणुन आम्ही काय गाउच नये काय?"
पण छ्या इथे एकदा का इमेज बिघडली कि वान्धा म्हणुन टि व्ही चाच आवाज वाढवावा लागायचा! ॥ ४ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते होतं मुलान्बरोबर हुतुतु खेळण्यात त्यान्च्या वयाच होउन भान्डाभान्डी करण्यात
पण छ्या मुद्दाम सुट्टी काढुन घरी बसलो तर नेमकी ती त्यान्च्या व्हीडिओ गेम मध्ये बुडुन गेलेली असायची! ॥ ५ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
कारण ते असतं मोकळ्या हवेवर पिसासारखं होउन उडण्यात, दूर दूर उभ्या असलेल्या बायकोला जोरात हाक मारण्यात
पण पेकेज टूरच्या धान्दलीत ते गिरकि घेणं राहुनच गेलं, तसं इकडुन तिकडे पळत मी जग सारं बघुन घेतलं ! ॥ ६ ॥
म्हणुन उर फ़ुटेस्तो धावावं लागतं आणि पैसा हाती लागेपर्यन्त असं लक्शात येत कि अरे ते तर निसटुन गेलं कि……..
पण ते असतं खळखळुन हसण्यात हसता हसता खुर्चीवरुन पडण्यात
आणि शेवटचे असे हसल्याला आणि लोटपोट झाल्याला किति वर्ष झाली बरं? माझं मलाच आठवेना झालय बघा ॥ ७ ॥
पण असो आणी असोच ठाकर्यानी कलमाडीला मर्सिडिझ मधला भिकारी म्हण्टलं
तसं मला हेवन सिटीतला दुख्खी प्राणी म्हणुन उगाच निर्भत्सु नका बरं का
माझ्यापरीने मी पण एक पुर्ण सुखी माणुस आहे……
आइ, वडील, बायको, मुले सर्वान्साठी दिवस रात्र मेहेनत करुन त्यान्च्या " आखोन्का तारा" ….
बनण्याचं सुख मला नक्कीच मिळालं आहे.
दमलास रे बाळा असे म्हणणार्या आइच्या शब्दातुन ते माझ्या अन्गोपान्गावर पसरत आहे
my boy has done excellent job for our country म्हणणार्या बाबान्च्या शब्दात ते आहे
दुखर्या पाठीवरुन हळुवार फ़िरणार्या बायकोच्या हातात ते आहे
आणि बाबा म्हणुन गळ्याला मिठि मारणार्या मुलान्च्या विळख्यात ते आहे.
जगी सर्व सुखी असा मीच आहे असा मीच आहे ॥ ८ ॥
What is called as happiness ?
To get it we need money so we run after money and when we get it we realize the life is over.
Happiness is to watch laughing infant but then I was on my project meeting.
Happiness is to lie down on mat after lot of work but then I have tomorrows work on mind which even a small worker does not.
Happiness is in the water bottle given by wife with a smiling and caring face but she was on her tour or gone out to office before me ever.
Happiness is in flying freely in the fresh air at countryside without package tour time constraints which I always have on our tour.
Happiness is in a big fresh laugh which I never find. It is only useless laughter show jokes that make me a bit laugh.
But still do not think I am a sad person I am proud of serving to nation and family for their upliftment.

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.