साठीच्या पुढील बॅटिंगचा माझा पॅटर्न

साठीच्या पुढील बॅटिंग पॅटर्न :
काल ईश्वराला असे म्हणण्याचा योग आला की आता पूर्ण समाधान आहे आता काहीही मागणं नाही.
● तसं दोन वर्षांपूर्वी साठाव्या वर्षालाच हे ठरवायला सुरुवात केली होती की नो बकेट लिस्ट / no wish list.
म्हणजे आता करायचंच असं काहीही ठरवायचं नाही. अमुक ठिकाणी जायचं, तमुक हे बघायचं हे खायचंय असं काही ठरवणे नाही.
 No desperate Longing for something or other. 
☆ बऱ्याचशा वेळा पाळले जाते, कधी कधी घसरतं पण चालू ठेवलंय.
 ● त्यात विरोधाभासात्मक वाटणारी दुसरी गोष्ट अशी आहे की; कुठलीच गोष्ट नाकारायची नाही. सर्व प्रकारचे आनंद घ्यायचे. 
● तिसरी गोष्ट अशी की; काम मात्र करत राहायचं.
❤️ किती रन आहेत, कधी आऊट आहे हे माहिती नाही. पण टार्गेट्स न ठरवता बॅटिंग करत राहायचं. रन्स होतील तेवढ्या होतील. 
~ प्रसाद फाटक ब्लॉग्स.
9822697288

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

HSV very important information. herpes simplex of genital or oral herpes decreased. Herpes ayurvedic treatment. hsv ayurveda treatment.