भारत हिंदुराष्ट्र आहे ❓

⚛️ 1.भारत हे हिंदुराष्ट्र आहे ⁉️

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्ताजी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा दाखल देत भारत हे हिंदुराष्ट्र होते, आहे व असेल असा उद्घोष केला आहे. डॉक्टर साहेबांनी देखील हा उद्घोष केला होता हे ही सत्य आहे. तसेच हिंदुस्थान हे देखील भारताचे च नाव आहे हे ही सत्य आहे. 

पण....

जर इतिहास व वर्तमानाचा मागोवा घेतला तर मात्र काही वेगळे वास्तव समोर येईल. ऐतिहासिक काळात देखील येथे हिंदू बाहुल्य होते. परंतु जरी ते या मातीतीलच धर्म असले तरी येथे बौद्ध व जैन हे वेगळे धर्म होते व त्यांचे जनलोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते. कित्येक बौद्ध व जैन यांना हिंदू धर्माबद्दल आस्था व काही हिंदू रीतिरिवाज पाळणे किंवा हिंदू दैवतं पुजणे हे घडतही आले आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक मिश्रण जगभरात सर्वत्र होत असते. परंतु हे दोन्ही धर्म पूर्णतः स्वतंत्र धर्मच राहिले आहेत. त्यांनी आपले अस्तित्व कधीही हिंदू धर्मात विलीन केलेले न्हवते आणि नाही. म्हणजेच पूर्वीदेखील भारत हा अनेक धर्मीय देश होता.

नंतर मात्र बाहेरून आले ते मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमक. त्यांचा विस्तारवाद, त्यांचे क्रौर्य व लबाडी या वृत्तीचा तीव्र निषेध च आहे.त्या द्वारा त्या 2 धर्मांचा येथे विस्तार झाला हे ही अयोग्यच झाले. परंतु जी जनता मुस्लिम व ख्रिस्ति झाली त्यांचे काय ? आज येथे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना तसे रहावेसे वाटत असेल तर त्यांना त्या धर्माचे राहू देणेच यथायोग्य व न्याय्य ठरते. म्हणून आज ही भारत बहुधर्मीय आहे.

हिंदुस्थानात राहणारे व या संस्कृतीत असणारे  सगळे हिंदू अशी व्याख्या तुम्ही केल्याने काही अन्य धर्मियांना ते हिंदू आहेत असे वाटणार नाहीये. त्यामुळे तो केवळ शब्दांचा खेळ आहे. आजच्या घडीला सनातन धर्मीय ते हिंदू, इस्लामी ते मुस्लिम and so on.... हेच प्रखर सत्य ! 

शिवाय आज पारशी, शीख हे आणि असे अनेक छोट्या संख्येने असणारे धर्मीय देखील रहातात ते ही हिंदू नाहीत.

टोटल इज : इतिहास व वर्तमान यात भारत ' हिंदू बहुल ' असला तरी संपूर्ण राष्ट्र हिंदूंचे कधीच न्हवते व नाही.

म्हणूनच असे म्हणेन की;

 " भारत ie इंडिया ie हिंदुस्थान हे राष्ट्र येथे राहणाऱ्या सर्व धर्मियांचे होते, आहे व असावे."  🕉️ ☪️ ☯️ ✝️

ताजा कलम : राहता राहिला धार्मिक आक्रमकता, क्रौर्य व विस्तारवादाचा प्रश्न. तर त्याबद्दल मानव जागरण मंच जगभरात सोशल मीडिया द्वारा जी भूमिका मांडतो तीच असणार म्हणजे की त्यांनी बदलावे. तसे न झाल्यास संघर्ष होत राहणार व सर्वांचंच नुकसान होणार. इतकंच काय पण हे ही सांगतो की सगळं जग मुस्लिम वा ख्रिस्ति करू म्हणालात तरी ते कधीच होणार नाही.

म्हणून आम्ही विनंती / आवाहन करतो की एक होऊया आणि म्हणूया की

" भारत हा इथे राहणाऱ्या सर्व धर्मियांचा देश आहे."

धन्यवाद. 🙏

🔯 2.मी काही अंशी *संतश्रेष्ठ तुकडोजी महाराजांच्या* मताप्रमाणेच विचारांचा असल्याने संघाच्या सोबत आहे. 

मागे मी म्हणल्याप्रमाणे मला संघाच्या *काही गोष्टी पटत नसल्या* तरीदेखील *हिंदू धर्म टिकला पाहिजे* एवढ्यासाठी देशाला संघ आवश्यक आहे. असे माझे मत आहे.

🌀 महाराज व संघ संबंध पार्श्वभूमी :

▶️विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंप च्या कार्यासाठी महाराजांकडे सहकार्य मागितले.  सर्वधर्मसमभाव मानत असतानाही महाराजांनी याला होकार दिला.

🌀 तेव्हाचे महाराजांचे विचार : 

▶️ तेव्हा ते म्हणाले की ; " मी सर्व धर्माना मानतो. पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान मी सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभाच मुळी मानवता आहे. "

⚛️ 3. Humanity is above everything. Love for God,religion or country in the world is fine and important but principally they come second. In a case; patriotism is very important but if your country imposes power grabbing on other countries or tries to bring back the impirialism then your patriotism has to take back seat and humanity remains high above it. Then You should protest your modern hitler too.



अनेक रंग अनेक पुष्प तरी तलाव / बगीचा म्हणून एकच.

 

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.