Summer sollutions ayurveda, marathi ayurveda note for summer

     उन्हाळा आला आता गरमीच्या त्रासाची शक्यता असते तेव्हा काळजी घ्यायला हवी नाहीतर उष्णतेचे  विकार होण्याचा संभव असतो. 
आयुर्वेदाचा सामान्य विशेष सिद्धांत म्हणतो कि सारख्याने सारख्याची वाढ होते व विरुद्ध ने घट होते.जर तुम्हाला उष्णता घटवायची असेल तर थंड आहार, पेय व वागणुक करायला हवी. 
    पेय : थंड पाणी हे अतिशय उत्तम व सोपा उपाय याने गरम पणा तर कमी होतोच शिवाय सूर्याने शोषल्याने कमी झालेले शरीरातील पाणी देखिल भरून निघते. हे तहाने प्रमाणे वारंवार देखिल प्यायले तरी चालेल. नैसर्गिक थंड करणारा फ्रीज म्हणजे माठ वापरा किंवा विद्युत फ्रीज दोन्ही चालेल. थंड पणा घशाला सोसवेल एवढा असावा. उभ्याने वरून गटागटा पिऊ नये तर सावकाश चव घेत प्यावे याने मुखातॆल कोरड पण नीट नाहीशी होते. पाण्याबरोबरच इतर पेय देखिल उपकारक ठरतात व पित्त शामक ही ठरतात ती अशी : सरबते : कोकम, लिंबू, वाळा,गुलाब उत्तम. तसेच दुग्धजन्य मध्ये दुध किंवा गोड टाक घ्यावे. उसाचा रस उत्तम. 
      आहार : कलिंगड, खरबूज, टरबुज, द्राक्षे गोड मोसंबी ही फळें, आईसक्रीम, गुलकंद, अंजीर, डाळींब, पांढरा कांदा व दही [ रात्री दही खाऊ नये ] काकडी इत्यादी पदार्थ खावेत. 
      विहार : उन्हात जायचे असल्यास टोपी व गोगल जरूर वापरावा. पंखा, वाळ्याचा पंखा, मर्यादित प्रमाणात व मानवेल असा एसी वापरावा. [ शीत प्रकृती लोकाना सर्दी तर अति वापराने कोरडेपणा व वात वृद्धी होते हे लक्षात असावे ], थंड पाण्याच्या तालावात पोहोणे चाङ्गले. दिवसा भरपूर झाडे असलेल्या उद्यानात बसणे हा उपाय गरीब लोकांसाठी बरा आहे. 
       औषधे : उशीरासव, सारीवासव, चंदनासव [ ३ चमचे व पाणी असे २ वेळा ], कामदुधा रस, गोदांती भस्म, चंद्रकला रस ही औषधे उपयुक्त आहेत. चंदन लेप किंवा शतधौत घृत लेप गरजेनुसार वापरावा. 
असा औषध अन्न विहार केल्याने उष्णता ताब्यात राहते. 
धन्यवाद आवडल्यास पुढे ढकला.  

-- 

Dr Prasad Phatak
Mob: 9822697288
        7588281952
02024471683

Comments

Popular posts from this blog

herpes treated fast by ayurveda: herpes zoster. PHN or pain after herpes. Herpes simplex well treated. genital herpes.

Dr Prasad phatak treats Nagin ya herpes by Ayurveda very fast

Psoriasis and ayurveda. eczema ayurveda twacha rog ayurveda.