मानवता मतलब बेहतर बनना. मराठीतून.
#मानवता मतलब बेहतर बनना । ● तुम्ही कुठल्याही जाती पंथ धर्माचे असा, तुम्हाला जुन्या नव्या ग्रंथांमधून काहीही सांगितलेले असो. तुम्ही त्याचे ॲनालिसिस करा. ● मला जाणवलेल्या काही कसोट्या सांगतो त्या कसोट्यांवर घासून पहा.... त्यातले चांगले ते स्वीकारा आणि जे कालबाह्य, चुकीचे आहे ते टाकून द्या. ● त्या कसोट्या अशा की - माणुसकीला पारखं व्हायचं नाही. कोणावर अत्याचार करायचे नाहीत. कोणाचे फसवून वा जबरदस्तीने धर्मांतर करायचे नाही. कोणाचेच शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक वा धार्मिक असे कुठल्याच प्रकारचे शोषण करायचे नाही. कोणाला कमी लेखायचे नाही. समूह द्वेष नकोच. समूह स्वार्थासाठी देखील दुसऱ्या समूहांचे शोषण करायचे नाही. जियो और जीने दो पाळायचं आणि जमेल तितकं सर्वांवर प्रेम करायचं. ■ माणुसकीच्या या कसोट्या लावूनच जुन्या गोष्टी स्वीकारायच्या आणि त्यात न बसणाऱ्या टाकून द्यायच्या. असं माझं मत आहे. पटलं तर होय म्हणा आणि पुढे ढकला. नाही पटलं तर तुमचं सांगा की बिनधास्त! 🙏😍